*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखक कवी गीतकार गायक संगीतकार अरुणजी गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
*”मोती”*
शिंपल्यात मोती आहे ईश्वरीय देणं
भावनांचे मोती वेचावे ओंजळीत IIधृII
धूळ वाळू कण जातात शिंपल्यात
नेकर चिकट पदार्थ करी आवरणII1II
सागरात मोती बनती शिंपल्यात
खनिज संपत्ती आहे आरोग्य अर्पितII2II
सूर्य चंद्राचे भासती मोतीसम किरण
पानावरील दव बिंदू मोती भासतातII3II
मोत्याचे अलंकार वाढवती लावण्य
मोत्यासारखे धान्याचे दाणे भासतातII4II
अक्षर असावे मोत्यासम दाणेदार
शिंपल्यातील मोती कोरडा राही पाण्यांतII5II
श्री अरुण गांगल.कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.Cell.9373811677.