You are currently viewing ढगफुटी शब्दांची…..!

ढगफुटी शब्दांची…..!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*ढगफुटी शब्दांची…..!!*

तिसावे..!!

 

जमिनीची मूळं सोडून

शब्द विदेशी झालेत

परकी चाहूल लागेस्तोवर

घरचे होऊन गेलेत..

 

अंकुरलेल्या नव्या शब्दांना

सन्मानाच्या पायघड्या अंथरल्या

वंदन शब्दांच्या पूर्वजांना…ज्यांनी

आपल्या पिढ्या घडवल्या..

 

कलगीतुरा शब्दांच्या ढगफुटीचा

अनुताप माजतचं राहिला

उत्सवकी…हा…..उपद्रव

मुलामा परकेपणाचा चढला..

 

व्रण विसावले भाषेवर

शब्दांच्या प्रसादातही प्रमाद

चलनी रिवाज उसनवारी

प्रतिमा भाषेची खड्ड्यात..

 

ढगफुटीच्या प्रचंड ओघात

शब्दचं प्रपंच आमचा

प्रतिमांनुरूप वर्तन शब्दांचे

अविर्भाव जपला घरंदाजपणाचा..

 

बाबा ठाकूर

गुलकंद..2

प्रतिक्रिया व्यक्त करा