तीन लाखपर्यंतची कामे विनानिविदा…

सिंधुदुर्गनगरी 

सहकारी सेवा सोसायट्या आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी   3 लाखापर्यंतच्या कामांना विनानिविदा पद्धतीने कामे करण्यात येणार आहे, अशी माहिती  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे  सहाय्यक आयुक्त सुनिल पवार यांनी  दिली.

         ज्या सहकारी सेवा सोसायट्या या कार्यालयाकडे नोंदणीकृत झाल्या आहेत, अशा सेवा सोसायट्यांना कामाची आवश्यकता असल्यास आपले प्रस्ताव शुक्रवार दि. 23 ऑक्टोबर 2020 रोजी सायंकाळी  5 वाजेपर्यंत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्ग येथे सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 2 =