You are currently viewing बाप बिना आगीनं जळणारा

बाप बिना आगीनं जळणारा

*डॉ.शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे सदस्य लेखक कवी मनोहर पवार केळवदकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*बाप बिना आगीनं जळणारा*

 

आयूष्यभर खस्ता खात जनमल्यापासून

ठोकरा बसत बाप

कुणब्याच्या जातकुळीत रक्ताळत कधी ठेसाळत घसाडत तरफडत असतो

राबराब राबतो रक्ताचं पाणी होईस्तर आपल्या चिल्या पिल्या करता…..

 

अस्मानी सुलतानी कोपात शापीत भोग वाट्याला आला तरी सणासुदीला बहीनीला नाही इसरत कधीही ……

 

ढोरा वासराच्या गळ्यातल्या घंटीचा नाद ऐकत तो विसर तो कडक उन्हाच्या झळी अन् झोंबणारा गारवाही…….

तसाही बाप काळजीन अन् घोरनं

जळतोच की जाळा वाचून…..आकांत न करता माझा बाप

का कधी कुणाला

कळतो ……..

 

कुण्या शासनाला दोष न देता बिचारा फुटकं नशिब समजून

मुंडक खाली घालून

फकत आसू गाळतो

सरणाविणा बाप

उभा जळतो .

 

……………………….

कवी – मनोहर पवार केळवदकर . मो. 9850812651.

प्रतिक्रिया व्यक्त करा