You are currently viewing राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आ.वैभव नाईक यांच्या पाठीशी ताकदीनिशी उभा राहणार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आ.वैभव नाईक यांच्या पाठीशी ताकदीनिशी उभा राहणार

कुडाळ :

आज मराठा समाज हॉल कुडाळ येथे कुडाळ-मालवण विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. आ. वैभव नाईक देखील व्यक्तीनीशी या बैठकीला उपस्थित होते. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमदार वैभव नाईक यांच्या ताकदिनिशी पाठीशी उभा राहून त्यांना तिसऱ्यांदा विधानसभेत पाठवण्याचा एकमुखी निर्धार या बैठकीत करण्यात आला आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत बोलताना म्हणाले की गेल्या पाच वर्षांमध्ये आ.वैभव नाईक यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनासोबत घेऊन सातत्यपूर्ण चर्चा करून काम केले. कुडाळ-मालवण मध्ये विकासाची गंगा काय असते हे वैभव नाईक यांच्या रूपाने अनुभवता आली, त्यांना सामान्य माणसाबद्दल जाण आहे. गेली १० वर्षे ते शेतकऱ्यांचे प्रश्न तळमळीने विधानसभेत सातत्याने मांडुन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देत आहेत. कोरोना काळात जीवाची पर्वा न करता त्यांनी मतदारसंघातील नागरीकांसाठी स्वतः रस्त्यावर उतरून आरोग्य सुविधा पुरविल्या, मतदारसंघातील पाण्याचे प्रश्न, शासकीय मेडिकल काॅलेज अशी अनेक विकासकामांची चौफेर फटकेबाजी केली. पुढे बोलताना सामंत म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याने मी म्हणजे आमदार वैभव नाईक असे समजून काम केले पाहिजे व आमदार वैभव नाईक यांना तिसऱ्यांदा विधानसभेत पाठवून देण्याचे आव्हान त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष शिवाजी घोगळे, सरचिटणीस भास्कर परब, सोशल मीडिया प्रमुख सचिन परब, कार्याध्यक्ष प्रसाद रेगे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा