You are currently viewing रडणार नाही, आता लढणार

रडणार नाही, आता लढणार

*नको भाई, नको दादा, आता फक्त अर्चनाताई*

 

*अभूतपूर्व महिलांच्या उपस्थितीत अर्चना घारे परब यांचा उमेदवारी अर्ज*

सावंतवाडी :

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या अर्चना घारे – परब यांना महाविकास आघाडी कडून सावंतवाडी मतदारसंघात उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती परंतु राजन तेलींना उमेदवारी जाहीर झाल्याने पक्षाकडून आयत्या वेळी डावलण्यात आल्यामुळे घारे यांनी आज अपक्ष राहण्याचा निर्णय घेतला आहे. थोड्याच वेळात त्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात निष्ठावान विरुद्ध गद्दार अशी लढाई रंगणार आहे. त्यामुळे आता रडणार नाही तर लढणार, असा इशारा देत तुम्ही माझ्यासोबत राहा अशी भावनिक हाक घारे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिली. यावेळी उपस्थित कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी आम्ही तुमच्यासोबत आहोत असा विश्वास व्यक्त केला. त्यामुळे जोरदार शक्ती प्रदर्शन करत त्यांचा अर्ज भरला जाणार असल्याचा दावा त्यांनी आयोजित मेळाव्यात केला आहे.

 

यावेळी पुंडलिक दळवी, प्रदीप चांदेलकर, योगेश कुबल, संदीप गवस, सौ दीपिका राणे, ॲड.नकुल पार्सेकर, सौ ममता नाईक, सौ पूजा दळवी, सौ सिद्धी परब, देवेंद्र टेमकर, याकूब शेख, नियाज शेख, काशिनाथ दुभाषी, फैजान शेख, सुदेश तुळसकर, हिदायतुल्ला खान, संजय भाईप, अजित नातू, भावतीस फर्नांडिस, सौ. मारीता फर्नांडिस, सौ गौरी गावडे, सौ कोरगावकर, सुनीता भाईप, कृष्णा नाईक, विनायक परब, सौ नीतिशा नाई, सुधा सावंत, ॲड. सायली दुभाषी संतोष जोईल, नवल साठेलकर, ऋत्विक परब, विवेक गवस, सूर्यकांत धरणे, बंटी कांबळी, सत्यवान साटेलकर, तौसीफ आगा, नारायण आसोलकर, सूर्याजी नांगरे, विशाल बागायतकर, विलास सावळ, महादेव देसाई, गौतम महाले, साबाजी देसाई, सागर नाईक आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा