*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*मन माझे फुलपाखरू*
°°°°°°°°°°°°°°°°°°°
अवखळ चंचल
मन माझे फुलपाखरू
कसे आवरू
चपळ।।
फुला फुलांवरती
स्वच्छंद जाते विहरत
मधुगंध शोधत
आनंदाने।।
रंगीत ठिपके
दिसतात किती देखणे
सौंदर्याचे लेणे
पंखावर।।
मऊ मखमली
पंखाचा तो स्पर्श
दाटतो हर्ष
मनात।।
असेच सतत
भटकून येते सगळे
फुलपाखरू आगळे
मनाचे…..।।
धरता पंख
घायाळ त्वरीत होते
मनही दुखावते
तसेच….।।
°°°°°°°°°°°°°°°°°°
अरुणा दुद्दलवार@✍️