येत्या काही दिवसातच सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात होणार डायलेसिस सेंटर सुरू

येत्या काही दिवसातच सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात होणार डायलेसिस सेंटर सुरू

जीवनरक्षा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांची माहिती

सावंतवाडी

गेले काही दिवस सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील डायलेसिस सेंटर हे नादुरुस्त झाले होते. ते मुंबई येथील कॉन्ट्रॅक्टरला दुरुस्त करण्याची मागणी करून दुरुस्त करण्यात आले आहे. या कामासाठी जिवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर तसेच उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले आहे. यासाठी लागणाऱ्या पाण्याचा रिपोर्ट चे निदान लवकरात लवकर झाल्यास येत्या काही दिवसांत हे डायलेसिस सेंटर सुरू होईल अशी माहिती राजू मसुरकर यांनी दिली आहे. हे निदान लवकरात लवकर सुरू होण्यासाठी देखील ते विषेश प्रयत्न करत असल्याचे पण त्यांनी यावेळी सांगितले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा