You are currently viewing भारतीय गोवंशाचे संवर्धन , संगोपन करणाऱ्या सर्व गो – प्रेमींनी ” वसुबारास ” उस्तव साजरा करावा

भारतीय गोवंशाचे संवर्धन , संगोपन करणाऱ्या सर्व गो – प्रेमींनी ” वसुबारास ” उस्तव साजरा करावा

*भारतीय गोवंशाचे संवर्धन , संगोपन करणाऱ्या सर्व गो – प्रेमींनी ” वसुबारास ” उस्तव साजरा करावा*

प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , जिल्हा उपाध्यक्ष , भाजपा – सिंधुदुर्ग.

*महाराष्ट्र शासनाने गोमातेला ” राज्यमाता – गोमाता ” म्हणून घोषित केले असल्याने ” वसुबारस ” उस्ताहात साजरा करावा .*

आश्विन कृष्ण द्वादशी म्हणजेच गोवत्स द्वादशी.या दिवशी वसुबारस हा सण साजरा केला जातो. ह्या वर्षी वसुबारस सोमवार दिनांक २८ ऑक्टोंबर रोजी आली आहे . वसुबारस ह्याचा अर्थ-वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. भारताची संस्कृती कृषिप्रधान असल्याने या दिवसाचे महत्त्व विशेष आहे. या दिवशी संध्याकाळी गाईची पाडसासह पूजा करतात. घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे. ज्यांच्याकडे घरी गुरे, वासरे आहेत त्यांच्याकडे ह्यादिवशी पुरणाचा स्वयंपाक करतात. घरातील सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात. नंतर हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात.निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात. ह्या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरुवात करतात. पुष्कळ स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो. यादिवशी गहू, मूग खात नाहीत. स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात. दिवाळी खऱ्या अर्थाने सुरू होते ते या दिवसापासून. दिवाळीतील उत्साह व आनंद लुटण्यासाठी सारा आसमंत तयार असतो. नवीन खरेदी, फटाके, फराळ, रांगोळ्या, किल्ले यांचा समावेश असणारी दिवाळी प्रत्येकजण आपापल्या परीने एन्जॉय करीत असतो.
भारतीय संस्कृतीत देवांनी सर्व विश्व व्यापले आहे असे मानले जाते. परमात्मा हा सर्वच ठिकाणी असतो. जीवनाच्या विकसनशील परंपरेत हे फक्त मानवतेपर्यंत मर्यादीत न राहता ‘सर्वभूतहिते’ हा त्याचा मुख्य आदर्श आहे. प्राणीमात्रावर फक्त दया न करता प्रेम करणे हा त्यामागील मुख्य उद्देश आहे. आपण देवांवर दया करत नाही तर देवावर प्रेम करतो व त्यांची पूजा करतो. म्हणूनच प्राण्यांमध्ये जर देव वसत असतील तर त्यांच्यावरही दया न करता त्यांचे पूजन केले पाहिजे. त्यांवर प्रेम केले पाहिजे. म्हणूनच भारतीय संस्कृतीच्या दृष्टीने मानवाच्या अंत:करणात प्राणीमात्रांसाठी आदर असला पाहिजे. भारतीय संस्कृती मानवाला पूर्ण सृष्टीवर प्रेम करावयास शिकविते. पृथ्वीतलावर गायीचे महत्त्व खूप जास्त आहे. म्हणूनच हिंदु धर्मात ” वसुबारास ” हा सण साजरा केला जातो .

प्रतिक्रिया व्यक्त करा