You are currently viewing गुर्जर समाजातील गुणवंतांचा २७ ऑक्टोबर रोजी गौरव सोहळा

गुर्जर समाजातील गुणवंतांचा २७ ऑक्टोबर रोजी गौरव सोहळा

जळगाव (गुरुदत्त वाकदेकर) :

पाचोरा तालुका आणि परिसरातील समस्त गुर्जर समाजाच्या वतीने गुणवंत गौरव सोहळा दिनांक २७ ऑक्टोबर २०२४ रोजी मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. समाजातील विविध पोटजातीतील गुणवंत विद्यार्थी, विशेष प्राविण्य मिळविलेले व्यक्ती तसेच त्यांचे पालक या सोहळ्यात सन्मानित होणार आहेत.

समारंभ रविवार, २७ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ९.३० वाजता स्वामी लॉन्स, गजानन पेट्रोल पंपाजवळ, भडगाव रोड, पाचोरा येथे आयोजित करण्यात आला आहे. गुणवंत विद्यार्थी, पालक आणि समाजातील सर्व मान्यवरांनी कार्यक्रमास वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमासाठी समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था, उद्योजक, व्यावसायिक आपल्या नावे बक्षिसे देऊ शकतात. स्मृतीचिन्हांवर त्यांची नावे नमूद केली जातील. यासोबतच दानशूर व्यक्ती किंवा त्यांचे प्रतिनिधी यांना सन्मानित करण्याचीही व्यवस्था आहे. कार्यक्रमाच्या प्रवेशद्वारावर देणगी स्वीकृतीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून, समाजातील सर्व बंधु-भगिनींनी आपल्या स्तरावर कार्यक्रमाची माहिती इतरांपर्यंत पोहोचवावी, अशी विनंती आयोजकांनी केली आहे. अधिक माहितीसाठी 7385108510 संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा