अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक पॅकेज देण्यात यावे – माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू
सिंधुदुर्ग
कोकणामध्ये नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे व वाऱ्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कोकणा मध्ये मोठ्या प्रमाणात भात शेती ही केले जाते व शेतकऱ्याचे मुख्य आर्थिक स्तोत्र त्याच्यावरच अवलंबून असते. भात पीक तयार झालेले असताना सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये पडलेल्या अतिवृष्टीमुळे पूर्णपणे शेती जमीनदोस्त होऊन शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. आंबा व काजू उत्पादन याच्यावरही मोठ्या प्रमाणात या अतिवृष्टीमुळे फरक पडणार आहे. कोकणातील भात शेती उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे क्षेत्र असल्यामुळे यांना आर्थिक मदत सरकारमार्फत करण्यात यावी नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करण्यात येऊन सरकार दरबारी याचा अहवाल सादर करण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र शासनाचे गव्हर्नर यांच्याकडे माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी केली आहे.
अशा अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाला लहान शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आर्थिक पॅकेज देण्यात यावे अशी मागणी गुरुवार दिनांक 24 ऑक्टोबर रोजी दिल्ली येथे देशाचे कृषिमंत्री शिवराज चौहान यांची भेट घेऊन करण्यात येणार आहे.