You are currently viewing राज्य सरकारकडुन मच्छिमारांना ६५ कोटी १७ लाखांचे पॅकेज जाहीर…

राज्य सरकारकडुन मच्छिमारांना ६५ कोटी १७ लाखांचे पॅकेज जाहीर…

सिंधुदुर्गमधील शेवटच्या मच्छिमारापर्यंत पॅकेजचा लाभ देण्याची ना.अस्लम शेख यांची ग्वाही…

सिंधुदुर्ग प्रतिनिधी :-

मच्छिमारी हंगामात आलेल्या क्यार व महा चक्रीवादळाच्या तडाख्यात नुकसान झालेल्या मच्छिमारांना राज्य सरकारने ६५ कोटी १७ लाखांचे पॅकेज जाहीर करून आपली मागणी मान्य केली याबद्दल कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी मत्स्योद्योग मंत्री अस्लम शेख यांची आज मुंबई येथे मंत्रालयात भेट घेऊन त्यांचे आभार मानले.तसेच सिंधुदुर्ग मध्ये या पॅकेजची अंमलबजावणी करण्याची मागणी केली.त्यावर ना.अस्लम शेख यांनी सिंधुदुर्गमधील शेवटच्या मच्छिमारापर्यंत पॅकेजचा लाभ देणार असल्याची ग्वाही देत तशी कार्यवाही करण्याचे निर्देश मत्स्य अधिकाऱ्यांना दिले आहेत.

ऐन मच्छिमारी हंगामात आलेल्या क्यार व महा चक्रीवादळाच्या तडाख्यात सिंधुदुर्ग मधील मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले होते.राज्य सरकारने याची दखल घेऊन मच्छिमारांसाठी  ६५ कोटी १७ लाखांचे पॅकेज जाहीर केले आहे. आमदार वैभव नाईक यांनी ही मागणी लावून धरत पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,मत्स्योद्योग मंत्री अस्लम शेख यांनी ही मागणी मान्य केली.त्याबद्दल आ.वैभव नाईक यांनी ना.अस्लम शेख यांची भेट घेऊन आभार व्यक्त केले.

तसेच केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेची सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यामध्ये योग्य अंमलबजावणी करण्यासाठी मी स्वतः व रत्नागिरी-सिंधुदुर्ग चे खासदार विनायक राऊत, सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत, आ. राजन साळवी यांच्या उपस्थितीत संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेणे आवश्यक असून सदर बैठक आयोजित करण्याची मागणी आ.वैभव नाईक यांनी ना.अस्लम शेख यांच्याकडे केली.त्याबाबतही  ना.अस्लम शेख यांनी नियोजनासाठी बैठक आयोजित करून प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचा फायदा देखील महाराष्ट्रात जास्तीत जास्त करून देण्यात येईल अशी ग्वाही दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

six + 9 =