*दिल्ली दरबारी ग्रीन सिग्नल; युवा नेते विशाल परब विधानसभा अपक्ष लढणार*
*अभूतपूर्व गर्दीत २८ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज*
*शंभर टक्के विजयी; गुलाल उधळल्यानंतर घर वापसी*
*दिल्ली दरबारी संवाद; सूत्रांची माहिती*
दिल्ली दरबारी ग्रीन सिग्नल मिळाल्याने, अखेर भाजपा प्रदेश युवा उपाध्यक्ष विशाल परब सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून 28 ऑक्टोबरला अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती सूत्रानी दिली. शंभर टक्के विजयी होणार; विजयाचा गुलाल उधळल्यानंतर, पुन्हा घरवापसी असा संवाद दिल्ली दरबारी झाल्याचे कळते.
युवा नेते विशाल परब हे 23 ऑक्टोबरला शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार होते. सिंधुदुर्गातील अग्रगण्य दैनिकात पहिल्या पानावर ‘आपण विधानसभा लढणार’ असल्याचे विशाल परब त्यांनी स्पष्ट केले होते.
विशाल परब यांना प्रदेश कार्यालयात बोलावणं आल्याचे कळते. यावेळी विशाल परब यांनी आपल्या सामाजिक कार्याचा अहवाल पक्ष श्रेष्ठींसमोर ठेवला, मात्र समाधानकारक संवाद न झाल्याचे कळते.
विशाल परब यांचे दिल्ली दरबारी काही नेत्यांशी सलोख्याचे संबंध आहेत. त्यांच्या वाढदिनी केंद्रातील भाजपा मंत्र्यांची उपस्थितीही होती. दिल्ली दरबारी संवाद साधल्यानंतर, अखेर विशाल परब यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ग्रीन सिग्नल मिळाल्याचे कळते. त्यामुळे 28 ऑक्टोबरला सावंतवाडी शहरातील जगन्नाथराव भोसले उद्यानातून विशाल परब हे अभूतपूर्व गर्दीत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.