सावंतवाडी काँग्रेसची विधानसभा मतदार संघातील बुथ कमिटी अध्यक्ष व बी.एल.ए. व प्रमुख पदाधिकारी यांची आढावा बैठक संपन्न
सावंतवाडी
आज सावंतवाडी काँग्रेसची विधानसभा मतदार संघातील बुथ कमिटी अध्यक्ष व बी.एल.ए. व प्रमुख पदाधिकारी यांची आढावा बैठक संपन्न झाली. विधानसभेचे उमेदवार व जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष श्री. विलास गावडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीला मार्गदर्शन करताना श्री. विलास गावडे यांनी काँग्रेस पक्षाचे चिन्ह व पक्षाचा विचार जनतेपर्यंत पोहचावा यासाठी प्रमाणिक प्रयत्न काँग्रेस पक्षाचे बुथ लेवल एजंट यांनी करावे. येणारा काळ हा काँग्रेस पक्षासाठी व जनतेसाठी अत्यंत चांगला असेल. त्यामुळे महाविकास आघाडीचा उमेदवार कोण आहे. यापेक्षा तो आपला उमेदवार आहे असे समजून प्रामाणिकपणे त्याला विजयी करण्यासाठी प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी निर्भिडपणे उभे रहावे असे आवाहन श्री. विलास गावडे यांनी केले.
मी सावंतवाडी विधानसभेसाठी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. मी गेली 35 वर्षे सामाजिक कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रामध्ये जे काम केले आहे. त्यामुळे पक्ष ज्येष्ठी देतील तो निर्णय आपणा सर्वांना मान्य असेल असेही ते म्हणाले यावेळी सावंतवाडी तालुका काँग्रेस अध्यक्ष श्री. महेंद्र सांगेलकर व वेंगुर्ला तालुका काँग्रेस अध्यक्ष श्री. विधाता सावंत यांनी प्रत्येक बुथची सखोलपणे आढावा घेऊन ज्या ठिकाणी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी काम करता येईल यासाठी गाव निहाय दौरा करुन बैठका घेण्याचे नियोजन करण्यात आले. यावेळी पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी यांच्याकडे वेगवेगळ्या जबाबदार्या सोपविण्यात आल्या यावेळी काँग्रेस नेते दिलीप नार्वेकर, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ईर्शाद शेख यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी रविंद्र म्हापसेकर, राघवेंद्र नार्वेकर, बाळासाहेब नंदिहळ्ळी, गजानन टक्कर, सिध्देश परब, संजय लाड, मायकल फर्नांडीस, सुधीर मल्लार, उत्तम चव्हाण, जगन्नाथ डोंगरे, विभावरी सुकी, माया चिटणीस, स्मिता तिळवे, विठ्ठल केदार, प्रकाश डिचोलकर, अभय मालवणकर, रुपेश आईर, बाळा नमशी, विनायक, नमशी, आनंद, गाडकर, पंकज मसुरकर, प्रथमेश परब, गणपत मांजरेकर, समीर भाट, संतोष तावडे, संतोष कासकर, शशीकांत गोसावी, रिहा डिसोजा, बबन डिसोजा, शरद गावडे, सिल्वहीया डिसोजा, उल्का सांगेलकर, भारती नार्वेकर, मयुर आसोलकर, चंद्रकांत राणे, प्रसाद मसूरकर, विष्णु पेडणेकर, ज्ञानेश्वर पारधी, सुभाष नाईक, हरिश्चंद्र मांजरेकर, केतनकुमार गावडे, गुणाजी गवस, अंकुश मलबारी, सखाराम परब, सचिन शेटये, सुमित डगरे, जुबेर जंगूभाई, शरीफ शेख, सुभाष परब, उदय माडगोलकर, शिवा गावडे, लक्ष्मण भुते, गणेश मिरजकर राकेश चितारी, दत्ताराम घाडी इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.