*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य लेखक कवी अरुण वि. देशपांडे लिखित शतक महोत्सवी काव्यपुष्प -*
*श्री गोंदवलेकर महाराज काव्यचरितावली*
काव्यपुष्प- १००
—————————————-
भकतांचे कल्याण व्हावे । त्यांनी सन्मार्गास ना सोडावे ।
नाम भगवंताचे घ्यावे । तळमळ हीच अंतरी
श्री महाराजांच्या ।। १ ।।
भविष्याची चाहूल त्यांना लागता । सांगती आपल्या भक्तां ।
करा स्थिर तुमच्या चित्ता । परिस्थिती असेल बिकट पुढती।।
२ ।।
कृती ही संस्कृती । ती कशी असे नेमकी कृती । भक्तांना हेच समजवती । श्री महाराज ।। ३ ।।
यासाठी ते उदाहरण संतांचे देती । म्हणती, असते संतांची कृती । कर्मात त्यांच्या निष्ठा असे भगवंताप्रती ।। ४ ।।
म्हणती महाराज, साहेबी अनुकरण करणे । ही नव्हेत सुधारणेची लक्षणे। आवड नामाची होणे । नाम घेणे,हे लक्षण सुधारणेचे ।। ५ ।।
नवीन शोध लागणे । त्यात सुख वाटणे । सुखाचे असे असणे । हे सुख देहपातळीवरचे हो ।। ६ । ।
शोध सुखाचे लागू दे । सोयी सुखाच्या मिळू दे ।
परी एक कळू दे । खरे सुख हेच नसे हो ।। ७ । ।
देहाचे सुख खरे नाही । ते मनाचे सुख नाही । भगवंत नाम नाही । तो मनाने सुखी होत नाही ।। ८ ।।
नाना शंका भक्त विचारीती। प्रश्न उपस्थित करिती ।
निरसन त्यांचे योग्य करिती । श्री महाराज ।। ९ ।।
––—————– ———————
करी क्रमशः हे लेखन कवी अरुणदास
—————————————-
श्री गोंदवलेकर महाराज काव्यचारितावली
काव्यपुष्प -१०० वे
कवी अरुणदास- अरुण वि.देशपांडे -पुणे
—————————————–