You are currently viewing माजगाव साधले वळणावर कालेली येथील युवकाचा अपघात

माजगाव साधले वळणावर कालेली येथील युवकाचा अपघात

माजगाव साधले वळणावर कालेली येथील युवकाचा अपघात

साक्षी वंजारी व सामाजिक बांधिलकीच्या रूपा मुद्राळे यांनी केले हॉस्पिटलमध्ये दाखल.

सावंतवाडी

आज सकाळी आठ वाजता बांदा येथे कामानिमित्त जाणारा माणगाव कालेली येथील चैतन्य जोशी वय वर्ष 32 या युवकाला कुडाळच्या दिशेने जाणाऱ्या पुणे येथील एका कारचालकाने जोरदार टक्कर दिली असता मोटर सायकल चालक थेट कारच्या काचवर जाऊन आदळला त्यामध्ये त्याच्या हाता पायाला व डोक्याला किरकोळ दुखापत झाली त्यावेळी घटनास्थळी काँग्रेस पदाधिकारी साक्षी वंजारी परसीयस टायस, सामाजिक बांधिलकीच्या रुपा मुद्राळे व हेलन निबरे यांनी या अपघाताची पोलिसांना कल्पना देऊन अपघात ग्रस्त युवकाला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
हा अपघात माजगाव साधले वळणावर झाला कारचालकाच्या समोर अचानक एका व्यक्ती आडवाला त्याला वाचवताना समोरून येणाऱ्या मोटर सायकल स्वारला टक्कर दिली त्या मध्ये कारचा पुढचा टायर फुटन कार सहित मोटर सायकलच सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले परंतु या अपघातात सुदैवाने युवकांचा सुदैवाने जीव वाचला.
याप्रसंगी सामाजिक बांधिलकीची रूपा मुद्राळे हेलन निबरे रवी जाधव व साक्षी वंजारी व परसीयस टायस यांनी सहकार्य केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा