You are currently viewing नाही करीत तू उगा प्रहार

नाही करीत तू उगा प्रहार

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

 

*नाही करीत तू उगा प्रहार*

 

हाती मिळता माईक कधीही

होऊन जातो चेहरा “हंसरा”

घालून जाकीट नेहमी काळे

असो पाडवा अथवा *दसरा*

 

भाव वाढतात जरी सोन्याचे

आपण असता नेहमीच शांत

“वाणी वागणे” करते आपले

गरीबालाही नेहमी *श्रीमंत*

 

हास्य मोकळे आणते जिंकून

दूरदूरचे कितीतरी अभिजन

करून पाठवे कविता कोणी

पाहून तुजला विचार ऐकून

 

व्यक्ती म्हणून विचार करती

कविता करणारे “विचारवंत”

विचार धन ते उधळीत रहा

नाही करायची कसली खंत

 

कवयत्री तू सांप्रत काळाची

नको घासू तू अलंकार जुने

विचार ऐकून कुबेर लाजतो

सोडून पळतो आळंदी पुणे

 

श्रीमंती पाहून रसिक जमतो

ऐकत असतो *नवे विचार*

आहे भुकेला *नव ज्ञानेश्वर*

*नाही करीत तू उगा प्रहार*

 

विनायक जोशी✍️ ठाणे

मीलनध्वनी/९३२४३२४१५७

रविवार २० आक्टोबर २०२४

प्रतिक्रिया व्यक्त करा