You are currently viewing दिप उजळू दे

दिप उजळू दे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*दिप उजळू दे* 

 

एक दिप उजळू दे, माझ्या अंगणात

येईन लक्ष्मी-कुबेर राजा, माझ्या घरात

 

धन धान्य ऐश्वर्याची, राहो भरभराट

सुख शांती सदा नांदो, माझ्या दारात

 

आचार विचार संस्कारांचा, असो सदा वास

समृद्धी संस्कृती संपन्नता, वसो जीवनात

 

लेकूरे उदंड व्हावी, स्वप्ने घेऊन उरात

बलवान भारत घडो, अखंड विश्वात

 

गरीब श्रीमंतीची दरी, मिटावी समाधानात

दारिद्र्याची नसावी रेषा, माझ्या देशात

 

स्वच्छ सुंदर निर्मळ जन गण, राहू कल्याणात

समतेची मशाल एकतेचा ध्वज, पाहू गगनात

 

ममत्वाचा एक दिप, जळो अंगणात

स्वर्ग सुख लाभो सदा, गरीबा घरात

 

कवी :-

*चंद्रशेखर प्रभाकर कासार*

*चांदवडकर, धुळे.*

7588318543.

8208667477.

प्रतिक्रिया व्यक्त करा