कणकवली :
विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर कणकवली मतदारसंघात उबाठा सेनेला धक्क्यावर धक्के मिळत आहेत. वारगाव येथील उबाठा युवासेना शाखाप्रमुख महेंद्र केसरकर यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत उबाठा सेनेला जय महाराष्ट्र करत भाजपचे कमळ हाती घेतले.
यावेळी आमदार नितेश राणे यांनी महेंद्र केसरकर यांचे भारतीय जनता पक्षात पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. व पक्षात योग्य तो मान सन्मान दिला जाईल, असे आश्वासित केले.
यावेळी तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर, कणकवली विधानसभा प्रमुख मनोज रावराणे, संतोष कानडे, बाळा जठार, नाना शेट्ये, राजा जाधव उपस्थित होते.