*प्रतीक्षित डेगवे-तांबोळी वनरस्त्याला तातडीने मंजुरी द्या*
*तांबोळी,असनिये,घारपी ग्रामस्थांनी घेतली उप-वनसंरक्षकांची भेट*
सावंतवाडी:-
सावंतवाडी तालुक्यातील वर्षानुवर्षे मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या डेगवे-तांबोळी रस्त्यावरील वनरस्त्याच्या मंजुरीकरीता आज तांबोळी,असनिये व घारपी येथील ग्रामस्थांनी सामाजिक कार्यकर्ते गुरु कल्याणकर यांच्यासोबत सावंतवाडीचे उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांची भेट घेत चर्चा व मागणी केली. तसेच याबाबत ग्रामस्थांच्या सह्यांचे निवेदन देखील सादर केले.
ग्रामस्थांनी सदर रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेकडे उपवनसंरक्षकांचे लक्ष वेधले. तसेच तांबोळी परिसरातील चार ते पाच गावातील नागरिकांकरीत रोजचा रहदारीचा रस्ता असून सदर गावातून मुख्य शहराकडे येण्याकरिता हाच एकमेव रस्ता आहे. सदर रस्ता हा दगड व चिखल यामुळे वाहतुकीस पूर्णपणे अयोग्य बनला आहे. येथून दुचाकीने प्रवास करणे तर शक्यच होत नाही.अनेक वेळा अवजड वाहने येथे अडकून पडतात.तसेच रोजचा वाहतुकीचा रस्ता असल्याने अनेक अपघात होत असतात. गेली कित्येक वर्षे या रस्त्यासाठी प्रयत्न होत असून देखील त्यास मंजुरी मिळत नाही. याकरिता वन खात्याकडून मागणी करण्यात आलेल्या आवश्यक त्या सर्व त्रुटी पूर्ण केलेल्या आहेत. तसेच प्रशासकीय मान्यतेकरीता देखील प्रस्ताव जिल्हा परिषदकडे सादर करण्यात आला आहे, हेदेखील यावेळी उपवनसंरक्षकांच्या ध्यानात आणून दिले. तरी या सर्व बाबींचा विचार करून सदर रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरणास लवकरात लवकर परवानगी मिळावी अशी विनंती ग्रामस्थांतर्फे उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांना करण्यात आली. तसेच सदर रस्त्याच्या ठिकाणी आम्ही ग्रामस्थ गतिरोधक बसवणे,हॉर्न न वाजवणे,प्राणी व झाडांच्या संरक्षणासाठी उपाययोजना करणे अशा सर्व उपाययोजना करण्यास तयार असल्याचे देखील त्यांना सांगितले. यावर सावंतवाडी परिक्षेत्राचे उपवनसंरक्षक रेड्डी यांनी याकरता आपल्याकडून पूर्ण सहकार्य देण्याचे तसेच प्रशासकीय मान्यतेचे काम पूर्ण झाल्यावर आपण इतर आवश्यक तांत्रिक बाबी त्वरित पूर्ण करून या रस्त्याच्या मंजुरीकरता कोल्हापूर येथील आपल्या वरिष्ठ कार्यालयात त्वरित सकारात्मक परिपूर्ण प्रस्ताव पाठवतो व त्याकरता पुर्ण प्रयत्न करतो असे आश्वासन ग्रामस्थांना दिले.
यावेळी गुरु कल्याणकर,तांबोळी सरपंच वेदिका नाईक,सदस्य मिलिंद देसाई,असनिये ग्रामपंचायत सदस्य संजय सावंत, ग्रामस्थ अभिमन्यु सावंत,शरद सावंत,चंद्रकांत भिसे,घारपी ग्रामस्थ गजानन सावंत,संतोष गावडे,रुपेश कविटकर,हेमंत गावडे आदी उपस्थित होते.
______________________________
*संवाद मीडिया*
*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘
*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*
🥜 *आमची उत्पादने*🥜
*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध🔹मधातला आवळा*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹
🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒
*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ🔸गावठी सुरय तांदूळ*
*🔸घावण पीठ/थालीपीठ🔸*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ🔸कडवे वाल*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन🔸पेणचे पांढरे कांदे माळ*
*🔸 मालवणी मसाला🔸खडा मसाला*
*🔸 भिमसेनी कापुर🔸मकाना🔸काजुगर*
*🔸 इतर कृषी उत्पादने*
*टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*
*🌎 www.sunandaai.com*
*✉️ sunandaaikrushi@gmail.com*
*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*