You are currently viewing १३ मे रोजी मसुरे श्री देव जैन भरतेश्वर मंदिर प्रथम कलशारोहण वर्धापन दिन

१३ मे रोजी मसुरे श्री देव जैन भरतेश्वर मंदिर प्रथम कलशारोहण वर्धापन दिन

मसुरे :

 

कसबा मसुरे गावचे ग्रामदैवत ३६० खेड्यांचा अधिपती मसुरे देऊळवाडा येथील श्री देव जैन भरतेश्वर मंदिराचा प्रथम कलशारोहण वर्धापन दिन सोहळा शनिवार दिनांक १३ मे २०२३ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमाने संपन्न होणार आहे. यावेळी सकाळी ७.३० वाजता होम हवन विधी सह धार्मिक कार्यक्रमास सुरुवात, दुपारी १२.४५ शाही पालखी सोहळा, दुपारी एक वाजता महाआरती, दुपारी एक ते तीन महाप्रसाद, दुपारी तीन ते साडेसहा स्थानिक सुस्वर भजने, सायंकाळी ७.३० वाजता शाही पालखी सोहळा, रात्री आठ वाजता महाआरती, रात्री १० वाजता श्री देवभरतेश्वर मंदिर नाट्य मंडळ मुंबई यांचे ‘माझ्या मना’ हे सामाजिक नाटक सादर होणार आहे. सर्व कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन श्री देव भरतेश्वर मंदिर ट्रस्ट च्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा