You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये पहिल्या प्रथम मालवण नगरपरिषदेच्या आमदार वैभव नाईक यांनी मंजूर केलेल्या नळपाणी योजनेच्या कामाला कार्यारंभ आदेश

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये पहिल्या प्रथम मालवण नगरपरिषदेच्या आमदार वैभव नाईक यांनी मंजूर केलेल्या नळपाणी योजनेच्या कामाला कार्यारंभ आदेश

*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये पहिल्या प्रथम मालवण नगरपरिषदेच्या आमदार वैभव नाईक यांनी मंजूर केलेल्या नळपाणी योजनेच्या कामाला कार्यारंभ आदेश*

*तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी मालवणच्या सुधारीत नळपाणी योजनेसाठी ४३ कोटी रु. निधी केला आहे मंजूर*

*मुख्याधिकारी संतोष झिरगे,नगरविकास प्रधान सचिव के. गोविंदराज, नगरविकास संचालक मनोज रानडे यांचे सहकार्य*

मालवण शहर वासीयांनी नगरपरिषदेची सत्ता शिवसेनेकडे दिल्यानंतर आमदार वैभव नाईक यांनी मालवणवासीयांची पाण्याची प्रमुख समस्या सोडवण्याच्या दृष्टीने मालवण नगरपरिषदेसाठी तब्बल ४३ कोटींची नळपाणी योजना मंजूर करून घेतली होती.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये पहिल्या प्रथम मालवण नगरपरिषदेत हि नळपाणी योजना मंजूर झाली आहे.मात्र या योजनेला शिंदे-फडणवीस सरकारने स्थगिती दिल्याने ही योजना रखडली होती. दरम्यान न्यायालयाने ही स्थगिती उठविल्याने या नळपाणी योजनेच्या कामाची निविदा प्रक्रिया आता पूर्ण झाली असून कामाला कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इतर मतदारसंघातील सत्तेतील आमदार व मंत्र्यांना जमले नाही ते आमदार वैभव नाईक यांनी मालवण मध्ये करून दाखवले आहे. त्यासाठी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संतोष झिरगे, नगरविकास विभाग २ चे प्रधान सचिव के. गोविंदराज व नगरविकास विभागाचे संचालक मनोज रानडे यांचे सहकार्य लाभले.

मालवण शहराला ३० वर्षा पूर्वीच्या धामापूर नळयोजनेद्वारे पाणी पुरवठा होत आहे. ही नळपाणी योजना गेल्या काही वर्षांपासून पूर्णतः जीर्ण झाल्याने या योजनेला अनेक ठिकाणी गळती लागते.त्यामुळे अनेक वेळा पाणी पुरवठा खंडित होतो. तसेच संपूर्ण शहरात हि नळ योजना विस्तारित न झाल्याने अनेक भागात पाण्याची समस्या जाणवत आहे. शहरालगतच्या गावामधून पाणी पुरवठयाची मागणी असूनही अपुऱ्या व जीर्ण झालेल्या पाणी पुरवठा योजनेमुळे शहरात पाण्याची समस्या जाणवत आहे. हि समस्या सोडविण्याच्या दृष्टीने आमदार वैभव नाईक यांनी सुरुवातीला ३३ कोटीची नळयोजना मंजूर केली होती. मात्र त्या निविदेला ठेकेदारांनी प्रतिसाद न दिल्याने सुधारित अंदाजपत्रक तयार करून अधिकाऱ्यांमार्फत २०१९ ते २०२२ या कालावधीत सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून आमदार वैभव नाईक यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करून तब्बल ४३ कोटी रु.निधीची सुधारित नळपाणी योजना मंजूर करून घेतली. जलसंपदा विभागाकडून देखील पाण्यासाठी आरक्षण वाढवून देण्यात आले होते. मात्र त्यानंतर सत्तांतर झाल्याने शिंदे- फडणवीस सरकारने महाविकास आघाडीच्या सर्वच कामांना स्थगिती दिली होती. त्यात मालवण नळयोजनेच्या कामाचा देखील समावेश होता.मात्र त्याविरोधात न्यायालयात केस दाखल केल्यानंतर न्यायालयाने सर्व कामांवरील स्थगिती उठविली आहे. त्यामुळे आता मालवण नळपाणी योजनेची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून या कामाला कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. धामापूर तलावातून हा पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

अनेक अडथळ्यांची शर्यत पार करून आमदार वैभव नाईक यांनी मंजुर केलेली आणि आता कार्यारंभ आदेश मिळालेली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही पहिली नळयोज़ना आहे.मालवण शहाराबरोबरच देवबाग, तारकर्ली, वायरी, कोळंब, सर्जेकोट, कुंभारमाठ आदी गावांना देखील या नळपाणी योजनेचा फायदा होणार आहे. त्यामुळे लवकरच मालवण वासीयांची पाण्याची समस्या सुटणार असून मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा