*दिव्यांका आचरेकर, ओजस्वी साळुंके, स्वरा तरवडकर प्रथम.*
मालवण :
अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण आणि बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा आचरे यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकाशभाई मोहाडीकर कथानगरी आचरे येथे मालवण तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे-
*गट अ) ३री/ ४थी*
*प्रथम* – दिव्यांका एकनाथ आचरेकर (आचरे डोंगरेवाडी)
*द्वितीय* – दिविजा जगन्नाथ जोशी (आचरे पिरावाडी)
*तृतीय* – पूर्वा लक्ष्मण कावले (हडी नं.२)
*उत्तेजनार्थ* १- मधुरा दीपक मिठबावकर (टोपीवाला प्राथमिक)
*उत्तेजनार्थ* २- कार्तिकी अमोल घाडी (आडवली नं.१)
*गट ब) ५वी/ ६वी*
*प्रथम* – ओजस्वी कैलास साळुंके (टोपीवाला हायस्कूल)
*द्वितीय* – मनस्वी पल्लव कदम (आडवली नं.१)
*तृतीय* – सक्षम संदिप पांगम (आचरे नं.१)
*उत्तेजनार्थ* १- श्रीश परेश तारी (आचरे पिरावाडी)
*उत्तेजनार्थ* २- श्रेया सुरेंद्र धुरत (तोंडवळी वरची)
*गट क) ७वी/ ८वी*
*प्रथम* – स्वरा नित्यानंद तळवडकर (आचरे पिरावाडी)
*द्वितीय* – नुर्वी गिरीश शेडगे (आचरे हायस्कूल)
*तृतीय* – दिव्या नितीन गावकर (इंग्लिश मिडीयम स्कूल आचरे)
*उत्तेजनार्थ* १- पार्थ प्रदीप सामंत (टोपीवाला हायस्कूल)
*उत्तेजनार्थ* २- यशश्री गुरुनाथ ताम्हणकर (माळगाव हायस्कूल)
सदर स्पर्धेचा उद्घाटन सोहळा प्रा. नागेश कदम, प्राध्यापक डी. एड. कॉलेज, मालवण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. प्रमुख अतिथी म्हणून श्री. सागर नाईक, झोनल मॅनेजर रत्नागिरी, बँक ऑफ महाराष्ट्र हे उपस्थित होते. कथामाला स्पर्धेला शुभेच्छा देताना नाईक म्हणाले, “मालवण कथामालेचे सर्व कार्यक्रम केवळ मालवण तालुक्यालाच नाही तर संपूर्ण भारत देशाला अभिमानास्पद आहेत. बँक ऑफ महाराष्ट्र सोबत जोपर्यंत कथामाला आहे, तोपर्यंत दोघांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धा अखंड चालू राहतील.” यावेळी कथामालेच्या वतीने सागर नाईक, सीलंबू अरुमुगल (शाखाधिकारी बँक ऑफ महाराष्ट्र आचरे), नागेश कदम, अनिता पाटील (मुख्याध्यापिका आचरे नं.१), रवी पाटील, महादेव शिर्के, चंद्रकला दिवेकर, नेहा बापट, अरविंद तेली, रावजी तावडे, अमृता मांजरेकर यांचा स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ भेट देऊन सत्कार करण्यात आला.
कथामाला मालवणच्या वतीने यावर्षीचा सेवामयी कर्मचारी पुरस्कार बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा आचरेचे प्रमुख रोखापाल श्री. महेश कोळंबकर यांना देवून त्यांचा कथामाला मालवणचे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांच्या हस्ते सपत्निक सत्कार करण्यात आला. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी नागेश कदम, महेश कोळंबकर, अरविंद तेली यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी दुर्वांक महेश चव्हाण या विद्यार्थी गायकाचा सुश्राव्य प्रार्थनेबद्दल स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. स्पर्धा समिती प्रमुख म्हणून परशुराम गुरव, श्रुती गोगटे, सायली परब, सुरेंद्र सकपाळ, संजय परब, श्रावणी प्रभू, नितीन प्रभू, मनाली फाटक, कामिनी ढेकणे, भावना मुणगेकर, तेजल ताम्हणकर, अमृता मांजरेकर, रावजी तावडे, अनिता पाटील, खंडेगावकर, कामिनी ढेकणे, शारदा भिसेन, अनिरुद्ध आचरेकर, योगेश मुणगेकर आदींनी काम पाहिले. स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा प्रकाश पेडणेकर , सल्लागार समिती सदस्य कथामाला यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी सदानंद कांबळी, गोविंद प्रभू, तुकाराम पडवळ, योगेश मुणगेकर, संजय परब, मनाली फाटक, भवन मांजरेकर आदी कथामाला कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामचंद्र कुबल यांनी केले, तर स्पर्धेची रूपरेषा पांडुरंग कोचरेकर यांनी विशद केली. सूत्रसंचालन गुरुनाथ ताम्हणकर यांनी केले, तर आभार सुगंधा केदार गुरव यांनी मानले.