You are currently viewing मराठी साहित्य मंडळाची राष्ट्रीय कार्यकारिणी घोषित….

मराठी साहित्य मंडळाची राष्ट्रीय कार्यकारिणी घोषित….

मुंबई

अखिल भारतीय मराठी साहित्य चळवळीचे मुख्य केंद्र असलेल्या मराठी साहित्य मंडळाची राष्ट्रीय कार्यकारिणी मंडळाच्या राष्ट्रीय सरचिटणीस कवयित्रीं सोनम ठाकूर यांनी मुंबई येथील मुंबई पत्रकार संघाच्या हॉलमध्ये नुकतीच घोषित केली आहे
ठाण्यामध्ये गेली 50 वर्ष साहित्य क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेले जेष्ठ साहित्यिक डॉ जयप्रकाश घुमटकर उर्फ कवी गोलघुमट यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे , विविध विषयांवर आपल्या लेखणीद्वारे परखडपणे कोणाचाही मुलाहिजा न बाळगता लिखाण करीत असतात, अशी ख्याती त्यांची संपूर्ण महाराष्ट्रभर आहे
तसेच ठाण्याच्याच संवेदनशील कवयित्रीं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जेष्ठ कवयित्रीं ललिता गवांदे यांची राष्ट्रीय उपाध्यक्षा पदी आणि कवितेचा ध्यास हाच माझा श्वास हे ध्येय बाळगणाऱ्या तरुण तडफदार वसई शहराच्या कवयित्रीं सोनम ठाकूर यांची राष्ट्रीय सरचिटणीस पदी तसेच ठाण्यातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते हेमंत म्हात्रे यांची खजिनदारपदी बहुमताने निवड झाली आहे हे विशेष होय.
कोल्हापूर येथील माजी प्राचार्या जेष्ठ लेखिका रेखाताई दीक्षित, बदलापूर येथील माजी मुख्याध्यापक जेष्ठ कवी सुरेश लोहार सर आणि ठाणे मुक्कामी असलेल्या जेष्ठ गजलसम्राज्ञी निलाताई वाघमारे यांची राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य पदी एकमताने म्हणून निवड झाली आहे,
त्यामुळे साहित्य क्षेत्रात विशेष आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 − three =