You are currently viewing शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुलींच्या वसतीगृह भ्रष्टाचारा संदर्भात….

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुलींच्या वसतीगृह भ्रष्टाचारा संदर्भात….

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुलींच्या वसतीगृह भ्रष्टाचारा संदर्भात….

‌काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांचे सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी अनिल पाटील यांना निवेदन सादर

सिंधुदुर्ग

मुलींच्या वसतीगृहासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालया पासून चालत पाच मिनिटाच्या अंतरावर असणारी इमारत वसतीगृहासाठी न घेता लांब जंगलातील इमारत का घेण्यात आली? आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार मुलींच्या वसतीगृहासाठी बाल सुधारगृह यांच्या जवळ नवीन व जुनी अशी वसतीगृहे आहेत. त्यापैकी एक वसतीगृह बाल सुधारगृहाचे अधिकारी मुलींच्या वसतीगृहासाठी देण्यास अनुकूल होते. वैद्यकीय शिक्षण सहसंचालक यांनी स्वतः या जागेची पहाणी केली होती. ही जागा साधारण वार्षिक चार लाख रुपये भाड्याने उपलब्ध होऊ शकली असती आणि ही जागा चालत पाच मिनिटांच्या अंतरावर असल्याने मुलींसाठी वाहतूकीची कोणतीही सोय उपलब्ध करून देण्याची आवश्यकता नव्हती. असे असताना लांब जंगल भागात वसतीगृहासाठी इमारत का घेण्यात आली आणि वसतीगृहाचे भाडे व मुलींच्या वाहतूक व्यवस्थेचा खर्च यासाठी पंचेचाळीस लाख रुपयांचा प्रस्ताव मंजूर करून का घेण्यात आला? सरकारच्या म्हणजेच जनतेच्या साधारण एक्केचाळीस लाख रुपयांचा जादा खर्च होणार असेल तर हा पैसा कोणाच्या खिशात जाणार आहे? या सर्व प्रकरणाची चौकशी होऊन सत्य जनतेसमोर आले पाहिजे आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.
महाविद्यालया पासून पाच मिनिटांच्या अंतरावर शासकीय इमारती उपलब्ध असताना पाच किलोमीटर लांब जंगलात मुलींसाठी वसतीगृहासाठी इमारत घेण्याचे प्रयोजन का? आज महिलांवरील अत्याचारात वाढ होत असताना अशा जंगलभागात या मुलींबाबत काही अनुचित प्रकार घडला तर त्याला जबाबदार कोण?
आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार जी जंगलभागात शासकीय वैद्यकीय महाविद्यालया पासून पाच किलोमीटर लांब वसतीगृहासाठी इमारत घेण्यात आली आहे. या इमारतीतील 34 खोल्या महिना 2800 रुपये भाड्याने मुळ मालका कडून घेण्यात आल्या आहेत म्हणजे वार्षिक भाडे अकरा लाख बेचाळीस हजार चारशे व वाहतूकीसाठीचा काही खर्च दाखवून लाखो रुपयांचा हा भ्रष्टाचार कोण करत आहे याची चौकशी करून दोषींवर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे.
या महाविद्यालयात देशभरातून मुली शिक्षणासाठी आलेल्या आहेत त्यांना अशा जंगलभागात ठेवणे उचित नाही. बहुसंख्य मुलींनी व त्यांच्या पालकांनी तक्रार करून सुद्धा त्याची दखल घेतली जात नाही. यामुळे 40% मुली वसतीगृह सोडून इतरत्र रहायला गेल्या आहेत. वरील सर्व गोष्टींची सत्यता तपासून दोषींवर कारवाई व्हावी अश्या आशयाचे निवेदन काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी अनिल पाटील सादर केले आहे.

यावेळी कुडाळ तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, ओरोस शहर अध्यक्ष महेश परब, तबरेज शेख आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा