सावंतवाडीत इमारतीच्या गॅलरी वरून खाली पडल्याने अडीच वर्षाचा मुलगा जखमी
लहान मुलांची काळजी घेणे गरजेचे – राजू मसुरकर
सावंतवाडी….
*एका इमारतीच्या गॅलरी वरून खाली पडल्याने अडीच वर्षाचा मुलगा जखमी झाला. त्याच्यावर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत ही घटना शहरातील माठेवाडा भागातील श्री आत्मेश्वर मंदिर जवळ शनिवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. मुलाला आई जेवण भरवत असताना अचानक मुलाचा तोल जाऊन तो गॅलरीतून थेट पडून इमारतीच्या लोखंडी पत्राच्या छपरावर पडून अडकल्याने तो बाल बाल बचावला*
*मात्र त्याला किरकोळ दुखापत झाल्याने तात्काळ त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर यांनी रुग्णाला धाव घेऊन मदत कार्य केले. पालकांनी आपल्या लहान मुलांची काळजी घेणे गरजेचे आहे असे मत राजू मसुरकर यांनी केले आहे.*
*तसेच सावंतवाडी मोती तलाव मध्ये पालक आपल्या मुलांना फिरायला घेऊन येतात अनेक पालकांची मुले मोती तलावामध्ये डोकावून बघत असतात व त्यांचे पालक मोबाईल वरती मग्न असतात त्यामुळे कदाचित असे तलावामध्ये पडून सुद्धा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे मसूरकर यांनी सांगितले आहे*
*यामुळे सर्व पालकांनी आपले मुलांची नेहमी काळजी करून दक्षता घेण्यात यावी अशी आव्हान जीवन रक्षा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र मसुरकर सावंतवाडी यांनी केले आहे*