You are currently viewing कुडाळात पोलिसांचे संचलन, केंद्रीय राखीव पोलीस दल दाखल..

कुडाळात पोलिसांचे संचलन, केंद्रीय राखीव पोलीस दल दाखल..

कुडाळात पोलिसांचे संचलन, केंद्रीय राखीव पोलीस दल दाखल..

कुडाळ

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुडाळ शहरांमध्ये आज सायंकाळी पोलिसांनी संचलन केले. यामध्ये कुडाळ पोलिसांसोबत केंद्रीय राखीव पोलीस दल सहभागी झाले होते.

विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत आणि या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. कुडाळ पोलीस ठाण्यामध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ७० जवान व ५ अधिकारी बंदोबस्तासाठी दाखल झाले आहेत. आज सायंकाळी कुडाळ पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी व केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान यांनी कुडाळ शहरांमध्ये संचलन केले.

यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी विनोद कांबळे, पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम तसेच केंद्रीय राखीव पोलीस दलाचे अधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा