मालवण :
दी अमॅच्युअर खो-खो असोसिएशन सिंधुदुर्गतर्फे १८ वर्षाखालील मुले व मुली जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा स्पर्धा २० ऑक्टोबर रोजी येथील वराडकर हायस्कूल येथे आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेतून निवडण्यात आलेला संघ २७ ते ३० ऑक्टोबर या कालावधीत धाराशिव येथे होणाऱ्या ४३ व्या राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेत सिंधुदुर्गचे प्रतिनिधित्व करणार असल्याची माहिती खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष अमित सामंत यांनी दिली.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, स्पर्धेसाठी वयोमर्यादा १८ वर्षाखालील असून जिल्ह्यातील सर्व क्लब, शाळा, संस्था आदी सर्वांना प्रवेश मिळेल. प्रत्येक संघात १५ खेळाडूंचा समावेश असेल. स्पर्धा बाद पद्धतीने खेळविण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघाने अधिक माहितीसाठी व आपला प्रवेश अर्ज १८ ऑक्टोबरपर्यंत सचिव संजय पेंडुरकर (९४२२३९२७९०) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष अमित सामंत यांनी केले आहे.