You are currently viewing अजून सारे तसेच आहे

अजून सारे तसेच आहे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*अजून सारे तसेच आहे*

(पादाकुलक वृत्त)

 

कळतच नाही काय बदलले

मुखवट्यात तो तसाच आहे

वासनेत तो बुडला आहे

देहभूक ती बाकी आहे ॥१॥

 

प्रगती झाली जगा जिंकले

म्हणून ती का रक्षित आहे

पांचालीच्या दु:खासाठी

काळ अजुनही रडतो आहे ॥२॥

 

मखरात तिचा हो उदोउदो

देवी असते नऊ दिनांची

नारीशक्ती गजरच नुसता

वहाणअसते ती पायाची ॥३॥

 

गांधारी वा शापित कुंती

त्याग सितेचा का हो होतो

भोगभोगते तेच आजही

हुंड्यासाठी जाळ लागतो ॥४॥

 

रोज बातम्या बळजोरीच्या

जन्माआधी हत्या होई

होता कन्या भारच वाटे

फूल कळीचे कसे न होई॥५॥

 

अजून सारे तसेच आहे

वेशापुरती प्रगती झाली

मने कुणाची कुठे बदलली

नीतीची तर घसरण झाली ॥६॥

 

*राधिका भांडारकर*

प्रतिक्रिया व्यक्त करा