You are currently viewing शासकीय कार्यालयाच्या आवारात धरणे आंदोलन,  मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर निर्बंध

शासकीय कार्यालयाच्या आवारात धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर निर्बंध

सिंधुदुर्गनगरी :

 

जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये जिल्हादंडाधिकारी/उपविभागीय दंडाधिकारी/तालुका दंडाधिकारी कार्यालय तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, शासकीय विश्रामगृह, सार्वजनिक ठिकाणे, रस्त्यावर कोणत्याही राजकीय पक्षाने, व्यक्तीने, संघटनेने निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने किंवा त्याच्या प्रतिनिधीने किंवा त्याच्या हितचिंतकाने धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत (दिनांक. २५ नोव्हेंबर, २०२४ पर्यंत) निबंध लावण्यात आले असल्याचे जिल्हादंडाधिकारी अनिल पाटील यांनी आदेशित केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा