*२ कोटी ९० लाख रुपये मंजूर.*
मसुरे :
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीपथावर वाटचाल करत आहे. राज्यात शिंदे, फडणवीस सरकारच्या माध्यमातून गतिमान विकास सुरु आहे. विकासाची ही गंगा अशीच वाहती राहणार आहे. खासदार नारायण राणे साहेब यांच्या माध्यमातून हक्काचा निधी गावागावात प्राप्त होत आहे. महायुती सरकारच्या माध्यमातून कोट्यावधी विकासनिधी प्राप्त होत असताना कुडाळ मालवण तालुक्यातील मागील दहा वर्षांचा विकासाचा दुष्काळ संपवायचा आहे. यापुढे या ठिकाणी जनतेच्या आशीर्वादाने हक्काचा आमदार असेल. मालवण कुडाळ मतदारसंघ राज्यातील टॉप ५ मतदार संघात असेल. असा विश्वास भाजपा नेते निलेश राणे यांनी मसुरे डांगमोडे येथे व्यक्त केला.
मसुरे येथे कोट्यावधी रुपये विकासनिधीतून मंजूर झालेल्या विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा भाजपा नेते निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला. या मध्ये मसुरे डांगमोडे वीरण हा रस्ता पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून मंजूर होऊन या साठी २ कोटी ९० लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. तर मसुरे मर्डे पोलीस स्टेशन ते गवळदेव हा रस्ता खासदार नारायण राणे यांच्या निधीतून १० लाख मंजूर झाले असून या दोन्ही कामाचा शुभारंभ माजी खासदार नीलेश राणे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. डागमोडे येथे बुवा ठाकूर तर मर्डे येथे मसुरे देवस्थान प्रमुख मधुकर प्रभुगावकर यांच्या शुभहस्ते भूमिपूजन करण्यात आले..
यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर म्हणाले मालवण कुडाळ मतदार संघात गेल्या दहा वर्षात येथील आमदारनी केवळ पत्रांचा पाऊस पाडला. प्रत्यक्षात काम झालीच नाहीत. अनेक रस्ते खड्डेमय बनले. गावात विकास निधी नाहीच अशी स्थिती होती. मात्र युती सरकार राज्यात सत्तेत आले आणि विकास गतिमान झाला. या ठिकाणी निलेश राणे यांनी विशेष लक्ष टाकले. मोठा विकासनिधी गावागावत दिला. केंद्र सरकारने पंतप्रधान ग्रामसडक योजना पुन्हा सुरु केली. अनेक रस्ते त्या निधीतून खा. नारायण राणे साहेब यांनी आणले. काही रस्ते विशेष प्रयत्नातून निलेश राणे यांनी मंजूर करण्यात महत्वाची भुमिका बजावली. काही रस्ते अधिकच नादुरुस्त होते. त्यांना प्रसंगी अधिक निधी लागला तर तो ही मंजूर करू. प्रसंगी खिशातुन देऊ मात्र विकासकामे पुर्ण झाली पाहिजेत ही भुमिका निलेश राणे यांची राहिली. असे सांगत धोंडी चिंदरकर म्हणले असे आमदार या मतदार संघाला हवेत. जनतेची मागणी लवकर पुर्ण होईल असा विश्वास चिंदरकर यांनी व्यक्त केला.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, तालुका प्रभारी आप्पा लुडबे, शहर प्रभारी संतोष गांवकर, माजी जिप अध्यक्ष सरोज परब, मधुकर प्रभुगावकर, महेश बागवे, लक्ष्मी पेडणेकर, माजी उपासभापती छोटू ठाकुर, बुवा ठाकूर, गायत्री ठाकूर, बाबू आंगणे, शिवाजी परब, वेरली सरपंच धनंजय परब, बच्चू प्रभुगावकर, पंकज सादये, जगदीश चव्हाण, पांडुरंग ठाकूर, हरी ठाकूर, जितेंद्र परब, पुरुषोत्तम शिंगरे, किरण पाटील, तात्या हिंदलेकर, विलास मेस्त्री, सचिन पाटकर, किशोर ठाकूर, परशु चव्हाण, डांगमोडे, मसुरे ग्रामस्थ, नवतरुण मित्र मंडळ डांगमोडेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी निलेश राणे यांचा डांगमोडे ग्रामस्थ आणि नवतरुण मित्र मंडळ यांच्या वतीने हृदय सत्कार करण्यात आला. गेली कित्येक वर्षाची मागणी निलेश राणे, खासदार नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून पूर्ण झाल्यामुळे ग्रामस्थांनी निलेश राणे आणि भारतीय जनता पक्षाचे आभार व्यक्त केले.
यावेळी मसुरे येथे भूमिगत वीज वाहिनीचे काम सुरू असून या कामाचे श्रेय विरोधक घेण्याचा प्रयत्न करत आहेत. सत्ता कुणाची आणि श्रेय कोण घेत आहे हे जनतेला आता कळून चुकले आहे. परंतु हे संपूर्ण काम सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुरू असून या कामासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, निलेश राणे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या माध्यमातून सदर निधी मंजूर झालेला आहे अशी माहिती यावेळी भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी दिली.
कार्यक्रमाचे आभार माजी जि प अध्यक्ष सौ सरोज परब यांनी मानताना भारतीय जनता पक्ष खासदार नारायण राणे निलेश राणे यांनी आतापर्यंत केलेल्या लोकाभिमुख कामाचा आढावा जनतेसमोर सादर केला.