You are currently viewing चित्रकला स्पर्धेत भोसले स्कूलची मिनिष्का कुमार प्रथम…

चित्रकला स्पर्धेत भोसले स्कूलची मिनिष्का कुमार प्रथम…

_*चित्रकला स्पर्धेत भोसले स्कूलची मिनिष्का कुमार प्रथम……*_

_आंबोली सैनिक स्कूल आणि पी.एफ डान्टस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा पहिली ते चौथी व पाचवी ते आठवी अशा दोन गटात पार पडली. पाचवी ते आठवी गटातून यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या मिनिष्का विकास कुमार हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला._
_मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन तिला गौरविण्यात आले. शाळेचे कलाशिक्षक गजानन पोपकर यांचे मार्गदर्शन तिला लाभले. मनिष्का हिच्या यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष, अच्युत सावंतभोसले, अध्यक्षा ऍड.अस्मिता सावंतभोसले, सचिव संजीव देसाई व मुख्याध्यापिका प्रियंका देसाई यांनी तिचे अभिनंदन केले._

प्रतिक्रिया व्यक्त करा