*शालेय रंगभरण स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ संपन्न*
*सावंतवाडी*
*पी.एफ. डॉन्टस फाऊंडेशन,सैनिक स्कूल आंबोली, सावंतवाडी नगर परिषद व सावंतवाडी पत्रकार संघ* यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि.13 ऑक्टोबर 2024 रोजी पार्वती देवी हायस्कूल, सावंतवाडी येथे घेण्यात आलेल्या शालेय रंगभरण स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ कोलगांव सैनिक पतसंस्था कोलगांव येथे पार पडला.याप्रसंगी सैनिक पतसंस्थेचे महाव्यवस्थापक श्री.सुनील राऊळ, पी.एफ. डॉन्टस फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री.जाॅय डांटस, सैनिक पतसंस्थेतचे चेअरमन श्री. बाबुराव कविटकर, सैनिक स्कूलचे कार्यालयीन सचिव श्री.दिपक राऊळ,प्राचार्य. श्री. नितीन गावडे, श्री. ह्रषिकेश गावडे.श्री.प्रल्हाद तावडे, परीक्षक श्री. डी.पी.सावंत सर,श्री.बी.व्ही.मालवणकर सर उपस्थित होते.पी.एफ. डॉन्टस फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री.जाॅय डांटस यांनी फाऊंडेशन स्थापनेचा उद्देश व पुण्यस्मरण सप्ताह निमित्त आयोजित कार्यक्रमांची माहिती दिली.सैनिक पतसंस्थेचे महाव्यवस्थापक श्री.सुनील राऊळ, यांनी विजेत्या बालचित्रकारांचे कौतुक केले.पालकांनी दिलेल्या ऊदंड प्रतिसादाबद्दल धन्यवाद दिले.या रंगभरण स्पर्धेत सावंतवाडीतील सुमारे १३०० बालचित्रकारांनी उस्फूर्त सहभाग घेतला.या समारंभात मान्यवरांच्या हस्ते विजेत्या बालचित्रकारांचा पारितोषिक व प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला.परीक्षक श्री. डी.पी.सावंत सर,श्री.बी.व्ही.मालवणकर सर यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.शालेय रंगभरण स्पर्धेचे विजेते खालील प्रमाणे आहेत :
*पहिला गट – पहिली ते चौथी*
1. *प्रथम क्रमांक* – कु. दूर्वा अजित सावंत – कै.सौ.सुधाताई वामनराव कामत जि.पू.प्रा. शाळा क्र. 02 – सावंतवाडी,इयत्ता 4 थी
2. *द्वितीय क्रमांक* – कु.प्रार्थना प्रणय नाईक – स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल,कोलगाव, सावंतवाडी – इयत्ता – 3 री
3. *तृतीय क्रमांक-* कु.निधी प्रशांत सावंत – मिलाग्रिस हायस्कूल, सावंतवाडी – इयत्ता 3 री
*उत्तेजनार्थ*
1. *उत्तेजनार्थ* – कु.स्वराली आनंद हरम – मदर क्वीन इंग्लिश स्कूल, सावंतवाडी – इयत्ता चौथी
2. *उत्तेजनार्थ* – कु.अनुप्रिया अजित राणे – जि. प. प्रा. शाळा क्र. 04, सावंतवाडी, – इयत्ता चौथी
*दुसरा गट – पाचवी ते आठवी*
1. *प्रथम क्रमांक* – कु.मिनिक्षा विकास कुमार – यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल – इयत्ता आठवी
2. *द्वितीय क्रमांक -* कु.तन्वी प्रसाद दळवी – राणी पार्वती देवी हायस्कूल, सावंतवाडी, इयत्ता – आठवी
3. *तृतीय क्रमांक -* वेणू अजित सावंत – कळसुलकर इंग्लिश स्कूल,सावंतवाडी, इयत्ता – आठवी
*उत्तेजनार्थ*
1. *उत्तेजनार्थ -* अब्दुलगनी आश्रफअली खान – श्री भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालय, माजगाव – इयत्ता – आठवी
5. *उत्तेजनार्थ* – तृप्ती जितेंद्र याडार – मळगाव इंग्लिश स्कूल, मळगाव – इयत्ता सातवी
बालचित्रकारांनी आपले मनोगत व्यक्त केले.प्राचार्य श्री. नितीन गावडे यांनी सर्वांचे आभार मानले.