You are currently viewing उबाठा गटाच्या राजकीय स्टंटबाजीला किंमत न देता, सिंधुदुर्गातील रुग्णांना अविरत सेवा देण्याचे आवाहन..

उबाठा गटाच्या राजकीय स्टंटबाजीला किंमत न देता, सिंधुदुर्गातील रुग्णांना अविरत सेवा देण्याचे आवाहन..

*सिंधुदूर्ग वैद्यकीय महाविद्यालयात जाऊन भाजपा शिष्टमंडळाने केले डॉक्टर व प्राध्यापकांचे अभिनंदन*

 

ओरोस :

आज सिंधुदुर्ग जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय येथे भाजपा पदाधिकाऱ्यांनी तेथे कार्यरत डॉक्टर व प्राध्यापक यांची भेट घेत त्यांच्या चांगल्या कामगिरीबद्दल अभिनंदन करत कुठल्याही राजकीय दबावाला बळी पडू नका, धमक्यांना घाबरू नका जनतेला अविरत सेवा द्या आम्ही आपल्या सोबत आहोत अश्या शब्दात धीर दिला.

कालच उबाठा गटाकडून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे ढोल वाजवत आंदोलन करण्यात आलं होत. हॉस्पिटल सारख्या संवेदनशील जागेत अतिशय नाजूक स्थिती असलेले रुग्ण ज्या अतिदक्षता विभागात असतात त्याच्या जवळ जाऊन ढोल वाजवत उबाठा गटाने आंदोलन केले. याचा निषेध करत त्याला न जुमानता रुग्णांना अविरत सेवा देणाऱ्या डॉक्टर व प्राध्यापक यांचे भाजपा शिष्टमंडळाने अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी जि. प. अध्यक्षा दिपलक्ष्मी पडते, माजी पंचायत समिती सदस्या सुप्रिया वालावलकर, पप्या तवटे, रुपेश कानडे, सुनील बांदेकर, शुभम परब, निलेश परब, मंदार पडवळ, गौरव घाडीगांवकर, आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा