You are currently viewing ॲड. देवदत्त परूळेकर यांना ‘कै. श्रीकांत सांबारी अष्टपैलू समाजसेवक पुरस्कार’ प्रदान

ॲड. देवदत्त परूळेकर यांना ‘कै. श्रीकांत सांबारी अष्टपैलू समाजसेवक पुरस्कार’ प्रदान

मालवण :

 

आचरा येथील मांगल्य मंगल कार्यालय येथे वैभवशाली श्री देव रामेश्वर ग्रामीण बिगर सहकारी पतसंस्था आचरा यांची २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष मंदार सांबारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी वैभवशाली पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. श्रीकांत सांबारी यांच्या स्मृती चिरंतन जपण्यासाठी सन २०२३ पासून संस्थेतर्फे ‘कै. श्रीकांत सांबारी अष्टपैलू समाजसेवक पुरस्कार’ देण्यात येतो.

यावर्षीचा पुरस्कार वेंगुर्ला येथील प्रसिद्ध साहित्यिक, प्रवचनकार ॲड. देवदत्त परूळेकर यांना अध्यक्ष सांबारी यांच्या हस्ते सन्मानपत्र, सन्मानचिन्ह शाल, श्रीफळ आणि रोख पाच हजार रुपये देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी श्रीमती वैशाली सांबारी, पतसंस्थेचे उपाध्यक्ष सुरेश हडकर, राजन पांगे, लक्ष्मण आचरेकर, डॉ. प्रमोद कोळंबकर, वामन आचरेकर, संतोष गावकर, पांडूरंग वायंगणकर, दिलीप कावले, कर सल्लागार सी. जी. कुबल, हेमांगी खोत, रागिणी ढेकणे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा