जिल्हा परिषद शाळा शेडशाळ केंद्र प्रमुखपदी राजकुमार दिवटे
शिरोळ : महान कार्य वृत्तसेवा
कवठेगुलंद ( ता.शिरोळ ) येथील कुमार विद्या मंदिरचे मुख्याध्यापक राजकुमार भूपाल दिवटे यांची कोल्हापूर जिल्हा परिषद शाळा शेडशाळ केंद्र प्रमुखपदी निवड झाली.
शासनाच्या जिल्हा परिषद शाळेत कुरुंदवाड येथील राजकुमार दिवटे यांनी अत्यंत प्रामाणिकपणे कर्तव्यनिष्ठेने कार्यरत राहून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची चांगली गोडी निर्माण केली आहे.त्यामुळे शिक्षणाच्या गुणवत्ता वाढीबरोबरच विविध उपक्रम राबवून त्यांनी चांगले विद्यार्थी निर्माण केले आहेत.त्यामुळेच ते विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून सर्वांना परिचित आहेत.१९८७ साली अब्दुललाट येथील जिल्हा परिषदेच्या कुमार विद्या मंदिरमध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले.त्यानंतर कुरुंदवाड क्रमांक ३ , पुन्हा अब्दुललाट ,मजरेवाडी ,शिरोळ दत्तनगर ,हेरवाड याठिकाणी शिक्षक आणि मुख्याध्यापक म्हणून कर्तव्य बजावले.त्यानंतर त्यांची २०२० साली कवठेगुलंद येथील कुमार विद्या मंदिरमध्ये मुख्याध्यापक म्हणून रुजू होऊन त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने प्रयत्न सुरु ठेवला आहे.त्यांच्या प्रामाणिक कर्तव्यनिष्ठ कार्याची दखल घेऊनच कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने त्यांची जिल्हा परिषद शाळा शेडशाळ केंद्रप्रमुखपदी निवड केली आहे.या निवडीबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.