You are currently viewing प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील धार्मिक स्थळे व प्रार्थना स्थळे खुली….

प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील धार्मिक स्थळे व प्रार्थना स्थळे खुली….

सिंधुदुर्गनगरी

मिशन बिगीन अगेन अंतर्गत जिल्ह्यातील प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील सर्व धार्मिक आणि प्रार्थना स्थळे सुरू करण्यात आली आहेत. सदर स्थळांच्या वेळेबाबत संबंधीत विश्वस्त, मंडळ, अधिकारी यांनी निर्णय घ्यावयाचा असल्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. या प्रार्थनास्थळांवर मास्क लावणे, शारिरिक अंतराचे पालन करणे, थर्मल स्क्रिनिंग करणे, वारंवार हात धुणे किंवा सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक असणार आहे. धार्मिक स्थळांबाबतचे नियम पुढील प्रमाणे असणार आहेत.

   कंटेन्मेंट झोन मधील धार्मिक व प्रार्थना स्थळे नागरिकांसाठी बंद राहतील. फक्त कंटेन्मेंट झोनच्या बाहेरील धार्मिक व प्रार्थना स्थळे सुरू करण्यास परवानगी असेल. 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, इतर आजाराने ग्रस्त व्यक्ती, गरोदर महिला आणि 10 वर्षांखालील लहान मुले यांनी घरीच रहावे, धार्मिक, प्रार्थना स्थळांचे व्यवस्थापन करणाऱ्या संस्था यांनी याबाबत नागरिकांना सूचना द्याव्यात. कोविड – 19 विषाणू संसर्गाच्या सामान्य प्रतिबंधात्मक उपयायजोनांसोबतच साध्या सार्वजनिक आरोग्य उपायांचेही पालन करणे आवश्यक आहे. सर्व उपयांचे, कामगार, सेवेकरी, अभ्यागत, भाविक यांच्याकडून पूर्ण वेळ पालन करणे बंधनकारक आहे. या सर्व सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तींमध्ये किमान 6 फूट अंतर असावे, मास्कचा वापर बंधनकारक आहे, हात साबणाने वारंवार धुणे, तसेच सॅनिटायझरचा वापर करणे, श्वसनासंबंधी शिष्टाचाराचे काटेकोर पालन करणे, शिंकताना, खोकताना टिश्यू पेपर किंवा हात रुमालाचा वापर करणे, नाक व तोंड पूर्णपणे झाकले जाईल यांची दक्षता घेणे, तसेच वापरलेल्या टिश्यूपेपरची योग्य ती विल्हेवाट लावणे, या ठिकाणी येणाऱ्या सर्व नागरिक, कामगार, भाविक, सेवेकरी यांच्या आरोग्याचे निरीक्षण करणे, आजारी असल्यास स्थानिक प्रशासन, जिल्हा प्रशासन यास कळविणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास प्रतिबंध असेल, येणाऱ्या सर्व लोकांनी आरोग्य सेतू ॲपचा वापर करावा, या ठिकाणी लक्षणे नसलेल्या व्यक्तींनाच फक्त प्रवेश द्यावा, नो मास्क नो एंट्री, कोरोनाचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीने ऑडिओ व व्हीडिओच्या माध्यामातून जनजागृती करावी, येणाऱ्या अभ्यागत, भाविकांबाबत निश्चित धोरण व वेळ ठरवावी, चप्पल, बूट गाडीतच ठेवण्यासाठी भाविकांना प्रवृत्त करावे. वाहन पार्किंगच्या ठिकाणी गर्दी होणार नाही याचे नियोजन करावे, आवाराबाहेरील सर्व दुकाने, स्टॉल, कॅफेटेरिया या ठिकाणी पूर्णपणे सामाजिक अंतराचे पालन करणे बंधनकारक असेल. भाविकांच्या रांगांचे योग्य व्यवस्थापन करणे आणि योग्य सामाजिक अंतराचे पालन करणे, परिसरातील स्वतंत्र प्रवेश व बाहेर जाणाऱ्या मार्गाची व्यवस्था करणे, वातानुकुल यंत्र, वायुविजनासाठई सीपीडब्ल्युडी च्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे, वातानुकुलित यंत्राचे तापमान 24 ते 30 डीग्री सेंटिग्रेट राखले जावे, सापेक्ष आद्रता 40 ते 70 पर्यंत असले. शक्यतोवर पुरेसी ताजी हवा, क्रॉस व्हेन्टिलेशन यांची पुरेसी व्यवस्था करणे. पुतळे, मूर्ती, पवित्र पुस्तके यांना स्पर्श करण्यास परवानगी असणार नाही. कोणत्याही परिस्थितीत गाण्यासाठी एकत्र येणाऱ्या व्यक्तींना परवानी देण्यात येऊ नये, धार्मिक प्रार्थनेसाठी एकत्र येवून एकच चटई, जमखाना वापर करण्यास परवानगी असणार नाही. भाविकांनी त्यांचा स्वतंत्र जमखाना, चटई आणावी जो की प्रार्थनेनंतर परत घेऊन जातील. धार्मिक, प्रार्थना स्थळांच्या आतमध्ये प्रसाद वितरण, किंवा पवित्र पाणी शिंपडणे या सारख्या शारिरिक अर्पणांना परवानगी असणार नाही. कम्युनिटी किचन, लंगर, अन्नदान, अन्नछत्र इत्यादी ठिकाणी अन्न तयार करताना व वितरण करताना योग्य शारिरिक अंतर राखावे, प्रभावी स्वच्छता, निर्जंतुकीकरण करावे, शौचालय, हात-पाय धुण्याचे ठिकाण इत्यादी ठिकाणी स्वच्छतेबाबत विशेष लक्ष दिले जावे. या ठिकाणी काम करणारे कर्मचारी, सेवेकरी यांना कोविड – 19 सुरक्षआ प्रोटोकॉल गरजेचा आहे. तसेच कामावर येणे अगोदर तसेच आठवड्यातून एकदा कोविड – 19 चाचणी करणे आवश्यक आहे. खाण्याच्या तसेच शौचालयाच्या ठिकाणी गर्दी नियंत्रण करणे आवश्यक आहे. या ठिकाणी येणाऱ्या व्यक्तींची संख्या, जागा आणि सामाजिक अंतराचा प्रोटोकॉल पाळला जाईल याबाबत संबंधीत पोलीस अधिक्षक, जिल्हाधिकारी यांना हमीपत्र देणे बंधनकारक असेल.

   आवारात बाधित किंवा संशयित रुग्ण आढळल्यास पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. आजारी व्यक्तीला इतरांपासून दूर असे स्वतंत्र खोलीत किंवा जागेत ठेवावे, डॉक्टरांनी तपासणी करेपर्यंत त्या व्यक्तीने मास्क वापरणे बंधनकारक असेल. तात्काळ जवळच्या वैद्यकीय सुविधा केंद्रात कळवावे, तसेच स्थानिक व जिल्हा प्रशासनास कळवावे, नियुक्त केलेल्या सार्वजनिक आरोग्य प्राधिकरणाद्वारे सदर रुग्णाबाबत जोखीम मुल्यांकन केले जाईल, त्यानुसार रुग्ण, त्याचे संपर्क आणि निर्जंतुकीकरण याबाबत पुढील कार्यवाही केली जाईल. सदर रुग्ण कोविड 19 बाधित असेल तर सर्व परिसर निर्जंतुकीकरण करण्यात यावा असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 − three =