*राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज पुण्यतिथी निमित्त कवयित्री पल्लवी उमरे लिखित अप्रतिम अभंग रचना*
*राष्ट्रसंत तुकडोजी महाराज*
🥀
यावली ग्रामासी / जन्मले ते संत
थोर राष्ट्रसंत / तुकडोजी /१
ग्रामविकासाची / धरुनीया कास
विश्वबंधुत्वास / आचरावे / २
ग्रामगीता सांगे / जीवनाचे सार
मौलिक विचार / तुकड्याचे /३
केले सुसंस्कृत / विचारांचे धन
करी प्रबोधन / किर्तनात /४
सामाजिक कार्य / खंजिरी भजन
करुन भ्रमण / देशोदेशी /५
ग्रामविकासाची / धरलीया कास
हीच मनी आस / ग्रामोन्नती /६
सोडूनीया सारे / जातपात धर्म
जाणूनीया मर्म / जीवनाचे /७
संदेश देऊन / विश्वबंधुत्वाचा
फोडीयली वाचा / स्त्रीअन्याया /८
मानवता धर्म / जनतेची सेवा
खरी इशसेवा / राष्ट्रधर्म /९
स्वातंत्र्य लढ्यात / दिले योगदान
भुषविला मान / चळवळ / १०
मोझरी ग्रामासी / देह ठेवीयला
आश्रम स्थापीला / * गुरुकुंज * / ११
सांगे ग्रामगीता / तुकड्याची गाथा
ठेविते हो माथा / चरणाशी / १२
©® पल्लवी उमरे,मुंबई 9766076424 ✍️