You are currently viewing मन झाडाचे किती विव्हळे

मन झाडाचे किती विव्हळे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*मन झाडाचे किती विव्हळे* 

 

मिस्किल हसुन खुशीत दिसतेस

सिद्धहस्त तू जरी हिरकणी

काय सुचवायचे आहे तुजला

बसलीस हाती घेऊन लेखणी

 

लिहून झाल्यावर *चारोळी*

मनी रेंगाळते कविता भोळी

गेला होऊन *दसरा* काल

किती सोन्याची झाली होळी

 

समोर येता कचरा *वेचक*

आठ्या ललाटी होत्या बोलत

सोने म्हणून *वाट लावली*

किती झाडांची डोळ्यांदेखत

 

उरले सुरले पाणी बाटलीतील

ओतत होतीस नेहमी मोरीत

चुकुनही नाही घातले कुंडीत

दागिने मिरविले “तरी ऐटीत”

 

करील कां झाड *क्षमा*

तुला कधीतरी आयुष्यात

किती लोकांना फसवून झाले

पान आपट्याचे दिले हातात

 

ओरबाडून आणली जंगलातून

नाही वेदना कळल्या कुणास

*प्रतीक* म्हणून जरी दिली

कळा लागल्या त्या *वृक्षास*

 

दोन क्षणात उरकून *सण*

होतो आपण जरी मोकळे

आयुष्यभराची होते जखम

मन झाडाचे किती *विव्हळे*

 

विनायक जोशी✍️ ठाणे

मीलनध्वनी/९३२४३२४१५७

रविवार १३ आक्टोबर २०२४

प्रतिक्रिया व्यक्त करा