हुमरमळा (वालावल) गावातील आमदार वैभव नाईक यांनी निराधार कुटुबाला केली आर्थिक मदत!
आर्थिक मदतीबरोबर दरमहा तीन हजार शासकीय मदत सुरु केली!
कुडाळ
हुमरमळा (वालावल) गावातील शोभा हळदणकर ही शाळेतील स्वयंपाक करुन आपला उदरनिर्वाह करीत असताना अचानक पॅरॅलीसीस ने एक बाजु पुर्ण निकामी झाल्याने गेले कित्येक दिवस अंथरुणाला खिळून आहे तिचे पती वयोवृद्ध असल्याने त्यांनाही शासकीय मदत अतुल बंगे यांनी दरमहा सुरू केली तसेच आजारी असलेली शोभा हळदणकर हीलाही संजय गांधी निराधार योजना सुरू करुन दरमहा शासकीय मदत सुरु करुन एका कुटुंबाला दरमहीना तीन हजार मिळतील असे प्रयत्न माजी सरपंच सौ अर्चना बंगे यांनी केले अशातच या निराधार कुटुंबाची कल्पना सरपंच श्री अमृत देसाई, ग्रामपंचायत सदस्य मितेश वालावलकर, ग्रामपंचायत सदस्या सौ हेमांगी कद्रेकर यांनी आमदार वैभव नाईक यांच्याकडे परिस्थिती सांगुन काही मदतीची मागणी केली होती त्यानुसार आम नाईक यांनी आज वैयक्तिक रोख स्वरूपात मदत आज माजी पंचायत समिती सदस्य श्री अतुल, माजी सरपंच सौ अर्चना बंगे, हेमंत कद्रेकर, गुरु परकर,दादा परकर यांच्या उपस्थितीत देण्यात आली यावेळी महादेव हळदणकर व शोभा हळदणकर या दांपत्याने आमदार वैभव नाईक यांचे आभार मानले,