You are currently viewing कलमठ ग्रामपंचायतीच्या वतीने ‘तू अमुची नवदुर्गा’ अनोखा उपक्रम

कलमठ ग्रामपंचायतीच्या वतीने ‘तू अमुची नवदुर्गा’ अनोखा उपक्रम

सरपंच संदिप मेस्त्री यांची संकल्पना..

 

नवरात्री औचित्य साधत विविध क्षेत्रात काम करणाऱ्या ९ महिलांचा केला सत्कार..

 

कणकवली:

नवरात्रीचे औचित्त साधून विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा यथोचित गौरव कलमठ ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आला. सरपंच संदिप मेस्त्री यांच्या संकपनेतून आरोग्य क्षेत्रात सहकार्यासाठी नेहमी सकारात्मक असणाऱ्या डॉ. रुपाली वळंजू वैद्यकीय अधिकारी प्रा.आ. केंद्र वरवडे, कार्यतत्पर तलाठी म्हणून सुवर्णा कडूलकर, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा विजेत्या शाळेच्या मुख्याध्यापक मधुरा सावंत शाळा कलमठ बाजारपेठ, गावात महिलेच्या रुपात गार्गी शिवलकर पोस्ट वूमन, आक्सा शिरगावकर राज्यस्तरीय तिरंदाज,ज्योती आमडोस्कर संगणक परिचारका, वर्षा राडये होमगार्ड, शैलेजा मुखरे नाविन्यपुर्ण शैक्षणिक व सामाजिक उपक्रम, अंकिता राणे ग्रामपंचायत कलमठ आयोजित विविध उपक्रमाची माहिती व योजना संपूर्ण गावामध्ये पोहोचविल्याबद्दल, या सर्व महिलांचा सन्मान करण्यात आला.

सन्मानाला उत्तर देताना डॉ. रुपाली वळंजू मॅडम आजचा सन्मान आमच्या साठी सुखद धक्का देणारा होता, आज पर्यंत केलेल्या प्रामाणिक कामाचा सन्मान झाला असून आम्हाला कोणतीही कल्पना न ग्रामपंचायत ने आम्हाला सरप्राइज दिले असून यातून आम्हाला अजून काम करण्याची ऊर्जा मिळेल असे सांगितले.

मुख्याध्यापक मधुरा सावंत म्हणाल्या ग्रामपंचायत कलमठ च्या वतीने विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नवदुर्गांचा सन्मान केलात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा मध्ये जिल्ह्यात पहिला क्रमांक मिळाला त्यात ग्रामपंचायतचे मोठे योगदान असून ज्या गावात महिलांचा आदर सन्मान होतो तो गाव योग्य विकासाच्या दिशेने चालत असतो.

सरपंच संदिप मेस्त्री म्हणाले, गावाच्या विकासात आपल्या सर्वांचे सहकार्य कायम राहिले म्हणूनच आपण २ वर्षे यशस्वीपणे काम करू शकलो, ग्रामपंचायत कलमठ नेहमीच नवे उपक्रम घेऊन समाजासमोर येत असताना त्यावेळी लागणाऱ्या प्रत्येक सहकार्यासाठी आपण नेहमीच सकारात्मकपणे प्रतिसाद दिलात. महिला स्नेही गाव संकल्प अंतर्गत उपक्रम राबवत असताना लागणारे सर्व सहकार्य दुर्गेच्या रूपाने केलात म्हणून आपला गौरव करताना आनंद आणि अभिमान वाटत आहे.

यावेळी ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण कुडतरकर, ग्रामपंचायत सदस्य रविंद्र यादव, नितीन पवार, श्रेयस चिंदरकर, स्वाती नारकर, नजराना शेख, प्रियाली आचरेकर, ग्राम पंचायत कर्मचारी महेंद्र कदम, कुशाल कोरगांवकर, गणेश सावंत, अण्णा सावंत, चव्हाण, जयेश मेस्त्री,समर्थ कोरगांवकर, सचिन वाघेश्री उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा