*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*असा हा ! शेजार माझा !*
माझ्या घरापाशी
दुकान दारूचं देशी
सा-या भक्तांची
हीच अवघी काशी….!
सदैव आनंदी आनंद इथे
दुःख इथे फिरकत नाही
हाणामारीत ! गळ्यातली मिठी
कधीचं सुटत नाही ..!
शेजार माझा गुणाचा …सदैव
भक्तीरसात बुडालेला राहतो
सणासुदीला..भरलेला गाभारा
सदा नाचण्यांत दंग असतो ..!
रंभा उर्वशीला हेवा वाटावा
असा मदमस्त डान्स इथे होतो
तिरप्या पावलांच्या मदतीला
ईश्वरचं भक्तांना आधार देतो..!
देवकृपेने इथे कुणाचे कपडे
आजवर कधी मळलेच नाही
भक्तीरसात रंगलेल्या भक्तांच्या
अंगावर ते !कधी राहीलेचं नाही.!
राष्ट्रीय सुट्टीला! देवचं भक्तांना
मागच्या दाराने प्रवेश देतो
हप्ता वरती पोचला की
गोकुळात! खंबा डान्स होतो ..!
असा हा आमचा शेजार
देवा !तुझे मनापासून आभार
तुझ्या प्रेमसुधेच्याआशिर्वादाने
पोर आमची बेवडी होणार
जन्मोजन्मी लायसन्स रिन्ह्यू होऊ दे!
देवा !असा स्वर्गिय माझा शेजार
हेचं …मागणं नशिबात उरलं आता
देवा! आता हेच पुरे कर !तू वारंवार
हे भक्त तुझ्याकडे लवकरच येणार
तुझे शेजारी होणार…!!
बाबा ठाकूर