सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था मर्यादीत फोंडाघाटचे सी.ई.ओ.प्रसाद पावसकर यांची अजित नाडकर्णी यांनी घेतली भेट
फोंडाघाट
सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था मर्यादीत फोंडाघाट चा आता विस्तार होत असून पतसंस्थेच्या नवीन शाखा कोल्हापूर रत्नागिरी जिल्ह्यासह सिंधुदुर्गात उर्वरित ठिकाणी सुरू करण्यास 33 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली आहे. अजित नाडकर्णी यांनी वैश्य समाज पतसंस्थेत भेट देवुन सर्व कर्मचारी आणि सी.ई.ओ. श्री.प्रसाद पावस्कर यांचे अभिनंदन केले. पतसंस्थेचे बाहेरच्या जिल्ह्यात शाखेचा विस्तार होतोय याचा सार्थ अभिमान असल्याचे अजित नाडकर्णी यांनी त्यांचे कौतुक केले. पतसंस्था चांगले काम करते त्या बद्दल चेअरमन मित्र श्री.बाळा वळंजु यांचेही अजित नाडकर्णी यांनी अभिनंदन केले.