कणकवली :
तळेरे ते विजयदुर्ग या रस्त्याच्या दुपदरीकरण व काँक्रिटीकरण कामाचे ऑनलाईन भूमिपूजन आज ११ ऑक्टोंबर रोजी सकाळी ११.०० वाजता कासार्डे तिठा येथे होणार आहे. ४१७.३७ कोटी रुपये खर्चाचा हा रस्ता असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन भूमिपूजन होणार आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार नारायण राणे, आमदार निरंजन डावखरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार नितेश राणे, आमदार वैभव नाईक, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, सचिव सदाशिव साळुंखे, संजय दशपुते, मुख्य अभियंता शरद राजपूत, जिल्हाधिकारी अनिल पाटील या मान्यवरांच्या उपस्थित होणार आहे.
यावेळी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अधीक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी, कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, उपअभियंता श्रीनिवास बासुतकर, कनिष्ठ अभियंता श्रीकृष्ण नवपुते यांनी केले आहे.