You are currently viewing आजगाव व भेडशी मध्ये उबाठा शिवसेनाला धक्का

आजगाव व भेडशी मध्ये उबाठा शिवसेनाला धक्का

आजगाव व भेडशी मध्ये उबाठा शिवसेनाला धक्का

आजगाव सरपंच अनुराधा वराडकर व भेंडी उपसरपंच सुमन डिगणेंकर यांनी केला शिंदे गटाच्या शिवसेनेमध्ये प्रवेश

सावंतवाडी

उबाठा शिवसेनेच्या भोम- आजगाव सरपंच अनुराधा वराडकर व साटेली- भेडशी उपसरपंच सुमन डिगणेंकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत सावंतवाडी येथे शिंदे गट शिवसेनेत प्रवेश केला या प्रवेशामुळे उबाठा शिवसेनाला धक्का बसला आहे.

साटेली भेडशी येथील गणपत डिंगणेकर हे गेल्या काही वर्षांपासून शिवसेना पक्षात काम करत होते. शिवसेना पक्षात फूट पडली तरी डिंगणेकर उबाठा सेनेत होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी माजी खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी काम केले होते. शिवाय साटेली भेडशी ग्रामपंचायत मध्ये पत्नी सुमन हिला उपसरपंच करण्यासाठी प्रयत्न केले होते. यावेळी महिला जिल्हाप्रमुख सौ. निता कविटकर, जिल्हाप्रमुख अशोक दळवी, प्रेमानंद देसाई, वेंगुर्ला तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, दोडामार्ग तालुका प्रमुख गणेश प्रसाद गवस, एकनाथ नारोजी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा