You are currently viewing महायुती सरकारमुळेच २५ वर्षांनतर गेळेवासियांसाठी सुवर्ण दिवस : रविंद्र चव्हाण

महायुती सरकारमुळेच २५ वर्षांनतर गेळेवासियांसाठी सुवर्ण दिवस : रविंद्र चव्हाण

महायुती सरकारमुळेच २५ वर्षांनतर गेळेवासियांसाठी सुवर्ण दिवस : रविंद्र चव्हाण

पालकमंत्री रवींद्र चव्हाण व शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याहस्ते गेळे ग्रामस्थांना जमिनीचे वाटप

सावंतवाडी । प्रतिनिधी :
वर्षानुवर्षे ज्या प्रश्नासंदर्भात आपण सर्वजण झटत होतो व संघर्ष करीत होतो तो गेळे येथील कबुलायतदार गांवकर जमीन प्रश्न खऱ्या अर्थाने आज सुटला आहे. पंचवीस वर्षानंतर हा सुवर्ण दिवस आपण पाहतो आहे तो फक्त आणि फक्त महायुतीच्या सरकारमुळेच. त्यामुळे आपले आशीर्वाद हे सदैव महायुतीच्या पाठीशी ठेवा , असे आवाहन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले.
गेळे कबुलायतदार महाराष्ट्र शासनाच्या जमीनीचे वाटप व पोटहिस्सा मोजणीच्या कागदपत्रांचे वाटपाचा कार्यक्रम सावंतवाडी येथील बॅरिस्टर नाथ पै सभागृहात संपन्न झाला. पालकमंत्री रवींद्र चव्हाण तसेच शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते प् प्रातिनिधिक स्वरूपात १० ग्रामस्थांना शासनाच्या पत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित ग्रामस्थांना संबोधित करताना पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व महसूलमंत्र्यांचे विशेष आभार व्यक्त केले.
यावेळी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे उपाध्यक्ष युवराज लखमराजे भोंसले, माजी आमदार राजन तेली, माजी नगराध्यक्ष संजू परब, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक सावंत, माजी नगराध्यक्ष संजू परब , जिल्हा बँक संचालक महेश सारंग, अतिरिक्त जिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसीलदार श्रीधर पाटील, भाजपचे युवा नेते संदीप गावडे, गेळे सरपंच सागर ढोकरे, आंबोली सरपंच सावित्री पालेकर, चौकुळ सरपंच सुरेश शेटये , जि. प .चे माजी उपाध्यक्ष रणजीत देसाई, एकनाथ नाडकर्णी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख बबन राणे, वेंगुर्ले तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, दिनेश गावडे, माजी नगरसेवक ॲड. परिमल नाईक, भाजपचे बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, माजी सभापती पंकज पेडणेकर, माजी नगरसेवक तानाजी वाडकर आदी उपस्थित होते.
पालकमंत्री पुढे म्हणाले, आंबोली चौकुळ व गेळे या गावांमधील कबूलायतदार गावकर प्रश्न सोडविण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवात केली. तत्कालीन महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी हा विषय पुढे नेण्याचे काम केले. तर शिक्षण मंत्री दीपक केसरकर व मी सातत्याने या प्रश्नाच्या पाठीशी राहून हा प्रश्न सोडविला.
महायुती सरकारच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळेच हा प्रश्न सुटू शकला असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
राज्यातील हे महायुती सरकार सर्वसामान्यांच सरकार आहे. त्यामुळेच हे काम होऊ शकलं. कोकणचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आमचं सरकार प्रयत्नशील होत. यापूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारने सर्व योजना बंद करण्याचे आपल्या काळात केलं होतं. या सर्व योजना सुरू करण्याच काम महायुतीने केल हे ध्यानात ठेवावे लागेल. यासाठीच सर्वांनी माहिती सरकारच्या पाठीशी ठामपणे उभे रहा असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
संदीप गावडेंसारखे प्रश्नांसाठी झटणारे कार्यकर्ते गावागावात तयार व्हावेत : रविंद्र चव्हाण

गेळे येथील जमीन वाटपाचा हा प्रश्न सोडविण्यासाठी संदीप गावडे हा कार्यकर्ता माझ्या दिवसरात्र सातत्याने मागे लागला होता. या जमीन वाटपा संदर्भात अभ्यासपूर्णरित्या माहिती गोळा करून ती प्रशासनाकडे सादर करून त्याचा योग्य पद्धतीने पाठपुरावा करण्याचे काम संदीप गावडे यांनी केले. प्रसंगी उपोषणासारखा मार्गही स्वीकारला. गावासाठी झटणारे असे युवक गावागावात तयार झाले पाहिजेत, असे गौरवोद्गार पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी काढले.

प्रतिक्रिया व्यक्त करा