You are currently viewing ‘दुःखाचे निवेदन’

‘दुःखाचे निवेदन’

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*’दुःखाचे निवेदन’*

 

*****************

माझ्या अंतःकरणातील घाव

तू बघतेस तेव्हा

तुझे पाणावलेले डोळे

मला अस्वस्थ करतात

तुझ्या काळजातील वेदना

मला अबोल दिसतात

 

तू माझं दुःख वाचतेस

त्या दुःखाचे निवेदन सुखांना देतेस

पण मांडू नकोस तू सुखाचे‌ गणित

त्यातून दु:ख वजा‌ होणार नाही

संघर्षाचा भागाकार केल्याशिवाय

जगण्याचे समिकरण सुटणार नाही

 

तुझ्या माझ्या वाटेला सुख येणे

एव्हढे सहज अणि सोपे नाही गं

त्या सुखांनाही माहीत आहे

तरी तू अश्रूंचा अभिषेक करतेस

हसण्याशी उसणा करार करून

व्यथा वेदना मनात साठवून ठेवतेस

 

जातील हे ही दिवस निघून

असं एकमेकांशी बोलून घेतो

जगण्याला सुरुवात करताना

राबणाऱ्या हातांना कष्टाची सजा देतो

कष्टाच्या घामाला मोल मिळत नसल तरी

दमलेल्या पाय पळवत असतो

संघर्षाच्या वाटेवर घाम गाळाचा असतो

 

आयुष्य कधी सुरू होते कधी संपते

काहीच कळत नाही

कष्टकरी माणसाला

दुःख जिंकू देत नाही

तेव्हा सांग त्या दुःखांना

घेऊन या आणखी तुमच्या सोयरांनाही

दुःख सहन करायची सवय झाली आहे

कारण दुःख माणसाला जगणे शिकवते

दुःखातूनच माणसाला शहाणपण येते

 

*संजय धनगव्हाळ*

*(अर्थात कुसुमाई)*

९४२२८९२६१८

९५७९११३५४७

प्रतिक्रिया व्यक्त करा