You are currently viewing कणकवलीतील आरक्षण बचाव रॅलीचा इफेक्ट; खारेपाटण नडगिवे बौद्धवाडी येथील असंख्य ग्रामस्थांचा भाजपात प्रवेश

कणकवलीतील आरक्षण बचाव रॅलीचा इफेक्ट; खारेपाटण नडगिवे बौद्धवाडी येथील असंख्य ग्रामस्थांचा भाजपात प्रवेश

*कणकवलीतील आरक्षण बचाव रॅलीचा इफेक्ट; खारेपाटण नडगिवे बौद्धवाडी येथील असंख्य ग्रामस्थांचा भाजपात प्रवेश*
*आमदार नितेश राणे यांनी केले भाजप पक्षात स्वागत
*काँग्रेसने आरक्षण संपविण्याची भाषा केली तर मी तुमची ढाल बनून उभा राहणार;आमदार नितेश राणे

कणकवली
कणकवली येथे झालेल्या आरक्षण बचाव रॅली मध्ये आमदार नितेश राणे यांनी “जय हिंद जय भीम..” चा नारा दिला होता. तसेच आरक्षण आपल्या हक्काचे आहे. ते कोणाला रद्द करता येणार नाही. त्यामुळे आपल्या संविधानाकडे कोणीही वाकड्या नजरेने बघणार नाही असा शब्द दिला होता. त्यानंतर आज आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली तसेच आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून होत असंलेली विकास कामे पाहून कणकवली तालुक्यातील नडगिवे बौध्दवाडी येथील ग्रामस्थांनी भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश केला.
यावेळी मनोहर पगारे, गणेश जाधव, कीर्तिकांत जाधव, दीपक पगारे, यशवंत पगारे, बाबल्या जाधव, अपूर्वा पगारे, विनय पगारे , तन्मय पगारे, हरेश पगारे, रोहित पगारे, सुनील जाधव, हेमंत जाधव, दिनेश पगारे, यशवंत जाधव, अनंत पगारे, सदाशिव पगारे, यांनी भारतीय जनता पक्षाचा झेंडा हाती घेऊन पक्ष प्रवेश केला.
यावेळी उपस्थित दिलीप तळेकर, बाळा जठार, सरपंच प्राची इस्वलकर रमाकांत राऊत,सूर्यकांत भालेकर, भाऊ राणे, सुधीर कुबल, राजू वरूनकर उज्वला चिके, अमित मांजरेकर किरण करले, जयदीप देसाई आधी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा