*भाजपा आमदार नितेश राणे यांचा धनगर समाज एसटी आरक्षणाला जाहीर पाठिंबा*
*आमदार नितेश राणे यांनी दिले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धनगर समाज एसटी आरक्षणाच्या पाठिंब्याचे पत्र*
*कोकण धनगर समाजाच्या वतीने कोकणचे युवा नेते नवलराज काळे यांनी 23 सप्टेंबर 2024 रोजी केली होती पाठिंब्याची मागणी.*
आमदार नितेश राणे यांनी 26 सप्टेंबर 2024 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धनगर एसटी आरक्षणाचा पाठिंबा असल्याबाबतचे पत्र पाठवून धनगर समाज एसटी आरक्षणास जाहीर पाठिंबा दिला आहे. आमदार नितेश राणे यांनी आपल्या पाठिंबा पत्रात असे म्हटले आहे की, महाराष्ट्रात धनगर जमात पिढ्यानपिढ्या मेंढपाळाचा व्यवसाय करीत असून ते पशुपालक आहेत, 1956 च्या एससी एसटी यादीत महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या यादीत अनुक्रमांक 36 वर *”धनगड”*(Dhangad) आल्याने”धनगर”(dhangar) जमात त्यांच्या संविधानिक हक्कासाठी गेले 68 वर्षापासून वंचित आहेत. वास्तविक *”धनगड”* नावाची जमात देशात काय कुठेच अस्तित्वात नाही.
महाराष्ट्र सरकारने माननीय मुंबई उच्च न्यायालय येथे लेखी तीन वेळा लिहून दिले आहे की महाराष्ट्रात धनगड अस्तित्वात नाहीत परंतु धनगर आहेत आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अस्तित्वहीन जमातीला आरक्षण देता येत नाही त्यामुळे तात्काळ महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय काढून धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे एसटी प्रमाणपत्र देण्यात यावे. असे नमूद करत सदर पत्राच्या आधारे माझा धनगर समाज एस टी आरक्षणास जाहीर पाठिंबा देत असून आपण ताबडतोब शासन निर्णय काढून धनगर जमातीला 68 वर्षापासून होणाऱ्या अन्यायातून मुक्त करावे असे विनंती आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे यांच्याकडे केले आहे. कोकणातून सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने धनगर एसटी आरक्षणासाठी पाठिंबा दिल्यामुळे आरक्षणाचा मार्ग सुखकर होईल त्यामुळे समस्त कोकण धनगर समाजाच्या वतीने कोकण धनगर समाज युवा नेते नवलराज काळे यांनी आमदार नितेश राणे यांचे आभार व्यक्त केले आहेत. काळे यांनी आमदार नितेश राणे यांचा कार्यकर्ता असल्याचा सार्थ अभिमान असल्याचेही म्हटले आहे. विधान सभा कार्यक्षेत्रामध्ये आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून धनगर समाजाला योग्य न्याय दिला आहे. शेवटच्या श्वासापर्यंत आरक्षणाची लढाई लढू जे सोबत येतील त्यांना सोबत घेऊन काम करू. राज्यामध्ये भाजपा आमदार गोपीचंद पडळकर कोकणातून इंजिनियर अनिल झोरे व सर्व टीम व सर्वसामान्य सकल धनगर समाज अत्यंत उत्कृष्ट काम करीत आहेत. त्यांच्या कार्याला खाऱ्याचा वाटा उचलून कोकणातून सहकार्य करू. कोकणातून इंजिनिअर अनिल झोरे यांनी आमदार नितेश राणे यांच्याकडून पाठिंबापत्र घेण्याची जबाबदारी नवलराज काळे यांच्याकडे दिली होती त्याप्रमाणे आरक्षणाच्या पाठिंब्याचं पत्र मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाला 26 सप्टेंबर 2024 रोजी पोच झाले आहे.