कुडाळ :
कुडाळ एमआयडीसी येथे बांबू हस्तकला संशोधन व मूल्यवृद्धी केंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन खासदार नारायण राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी शिक्षण मंत्री दीपक केसरकर उपस्थित होते. देशातील हा पहिला प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होत असून याचा फायदा या ठिकाणच्या महिलांना मोठ्या प्रमाणावर होणार असल्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी सांगितले.
कुडाळ एमआयडीसी येथे सिंधूरत्न समृद्ध योजनेतून मंजूर झालेल्या बांबू संशोधन व मूल्यवृद्धी केंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन झाले यावेळी बांबू संशोधन व मूल्यवृद्धी केंद्राचे मोहन होडावडेकर, भाजपचे कुडाळ मंडळ अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, शिवसेनेचे जिल्हा संघटक रुपेश पावसकर, तालुकाप्रमुख बंटी तुळसकर, अरविंद करलकर, युवा मोर्चाचे रुपेश कानडे, मोहन सावंत, संजय भोगटे, ॲड. अमोल सावंत, शेखर सामंत, रोहित भोगटे, नायब तहसीलदार गोसावी, प्रतीक आढाव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र किणी, कुडाळ अभियंता धीरज पिसाळ, एमआयडीसीचे उपअभियंता अविनाश रेवंडकर आदी उपस्थित होते.
यावेळी शिक्षण मंत्री व सिंधूरत्न समृद्ध योजनेचे अध्यक्ष दीपक केसरकर म्हणाले की ही इमारत बांधकाम विभागाच्या माध्यमातून उभारण्यात येणार आहे. या इमारतीमध्ये बांबू संदर्भातील प्रशिक्षण तसेच बांबूपासून बनवल्या जाणाऱ्या वस्तू असणार आहेत. बांबू पासून नवीन आर्थिक क्रांती घडू शकते. हा रोजगार प्रत्येक घरामध्ये निर्माण होऊ शकतो. त्यामुळे महिला सक्षम होऊ शकतात. भारतातील हा पहिला प्रकल्प सिंधुदुर्गात होत आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.